एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown 2 | लॉकडाऊन वाढला; रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मेपर्यंत बंद
देशात 3 मेपर्यंत रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा 3 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूकही त्यामुळे बंदच राहणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंसाठी मालगाड्या चालू राहणार
भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगतले, की प्रवासी रेल्वे सेवा 3 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी माल वाहतूक चालू राहणार आहे.देशातील सर्व मेल, एक्स्प्रेस, मेट्रो, लोकल या सर्व सेवा ३ मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे येणार असल्याचे पत्रक रेल्वे बोर्डाने काढले आहे. देशातील लॉकडाऊनच्या काळात मालगाडी अधिक वेगाने धावणार आहेत. प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या थांबल्याने मालगाड्यांनी अधिक वेग घेतला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी 14 एप्रिलपासून बुकिंग सुरु होणार असल्याची अफवा पसरविण्यात येत होती. मात्र, रेल्वेने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले होते. आता लॉकडाऊन वाढल्याने रेल्वे सेवाही बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Lockdown2 | PM Narendra Modi | 3 मेपर्यंत भारत लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण
लॉकडाऊनची घोषणा करताना मोदी काय म्हणाले?
लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मोदी म्हणाले की, "3 मे पर्यंत आपल्या सर्वांना, देशाच्या प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावं लागणार आहे. या दरम्यान आपल्याला त्याचप्रकारे पालन करायचं आहे, जसं आतापर्यंत करत आलो आहोत. आता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एक जरी रुग्ण वाढला तर तो चिंतेचा विषय असेल."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement