एक्स्प्लोर
रेल्वेचा किळसवाणा कारभार, पूर्वा एक्सप्रेसमध्ये जेवणात पाल!
रेल्वेतील खाद्यपदार्थांबाबत प्रवासी नेहमीच तक्रारी करत असतात. पण आता एका प्रवाशाच्या जेवणात चक्क पालच सापडल्यानं रेल्वेचा ढिसाळ कारभार पुन्हा उघड झाला आहे.
नवी दिल्ली : हावडाहून दिल्लीला निघालेल्या पूर्वा एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या जेवणात पाल सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे रेल्वेतील खाद्यपदार्थ्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
बिहारमधील मोकामा स्थानकाजवळ एका प्रवाशानं रेल्वेच्या पँट्रीकारमधून व्हेज बिर्यानी मागवली. पण त्यामध्ये त्याला चक्क पाल सापडली.
जेवणात पाल सापडताच या रेल्वे प्रवाशानं बक्सर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे मंत्रालयाला यांना याबाबतची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यानंतर मुगलसराय स्टेशनवर ट्रेन पोहचताच डीआरएमसह अनेक अधिकारी या प्रवाशाची चौकशी करण्यासाठी तात्काळ पोहचले. तसेच त्याला योग्य औषधही देण्यात आलं आणि त्यानंतरच ट्रेन रवाना करण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रेल्वेमध्ये मिळणाऱ्या पदार्थांबद्दल सीएजीनं एक धक्कादायक अहवाल सादर केला होता. सीएजीनं आपल्या अहवालात असं म्हटलं होतं की, रेल्वेमध्ये मिळणारे पदार्थ हे बऱ्याचदा अस्वच्छ पद्धतीनं तयार केलेले असतात. अनेकदा तक्रारी करुनही रेल्वेतील खाद्यपदार्थांमध्ये सुधारणा झालेली नाही.Chandauli (UP): Lizard found in food served to a passenger on-board Poorva Express; passenger had complained to Railway Minister on Twitter pic.twitter.com/J7jv4s25j7
— ANI UP (@ANINewsUP) July 26, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement