एक्स्प्लोर

Lakhimpur Kheri : लखीमपूरमध्ये राहुल गांधींना 'नो एन्ट्री'; तर अटकेची कारवाई करणाऱ्या योगी सरकारवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi Lakhimpur Kheri Visit : काँग्रेस नेते राहुल गांधी आज उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीला भेट देण्याची शक्यता आहे. या संदर्भात काँग्रेसनं प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

Rahul Gandhi Lakhimpur Kheri Visit : Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधल्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज तिथं जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आज लखीमपूरला जाण्याची परवानगी मागितली होती. पण योगी सरकारनं त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्रानं शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप झाल्यानंतर लखीमपूरमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतर तिथं कलम 144 लागू करण्यात आलंय. राजकीय पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही वाटेतच रोखून त्यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज लखीमपूर खेरीला भेट देण्याची शक्यता आहे. या संदर्भात, काँग्रेसनं उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे की, ज्याप्रमाणे टीएमसी नेत्यांना लखीमपूर खेरी घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांना परवानगी द्यावी. राहुल गांधी अशावेळी लखीमपूर खेरीला भेट देण्याचा विचार करत आहे, जेव्हा त्यांची बहीण प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात आहे.

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना ताब्यात घेतल्यापासून राहुल गांधी सतत प्रियांका गांधी यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी ट्वीट केलं आणि म्हटलं की, "ज्यांना ताब्यात घेतलंय ती घाबरत नाही, खरी काँग्रेसी आहे. हार मानणार नाही! सत्याग्रह थांबणार नाही. #FarmersProtest" राहुल गांधी यांनी सोमवारी ट्वीट करत म्हटलं होतं, की "प्रियंका, मला माहीत आहे की, तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या धाडसाला घाबरतात. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू #NoFear #लखीमपुर_किसान_नरसंहार''

प्रियंका गांधी काय म्हणाल्या?

प्रियंका गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास सांगितले की, त्यांना सीतापूरच्या पीएसी आवारात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आले आहे आणि 38 तासानंतरही एकही कोणतीही प्राथमिकता दाखवण्यात आलेली नाही. प्रियांका गांधी म्हणाल्या की तिला आतापर्यंत कोणत्याही दंडाधिकारी किंवा न्यायिक अधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले नाही किंवा तिला तिच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. तिचे वकील सकाळपासून परिसरातील गेटवर उभे आहेत.

त्या म्हणाल्या, "मला अटक करताना माझ्यावर आणि माझ्या साथीदारांवर पूर्णपणे बेकायदेशीर बळाचा वापर कसा केला गेला आहे, याचा तपशील देत नाही. कारण, हे विधान केवळ हे स्पष्ट करण्यासाठी आहे की मला बेकायदेशीरपणे पीएसी परिसरात ठेवण्यात आले आहे" प्रियंका गांधी आणि दीपेंद्र हुड्डा यांना लखीमपूर खेरीकडे जाताना ताब्यात घेण्यात आले आणि सोमवार सकाळपासून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या म्हणाल्या की त्यांनी सोशल मीडियावरील एका पेपरचा काही भाग पाहिला ज्यात प्रशासनाने 11 जणांना नामांकित केले आहे आणि त्यापैकी आठजण असे होते जे त्याच्या अटकेच्या वेळी तिथं उपस्थित नव्हते. रविवारी तिकोनिया गावात तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Priyanka Gandhi : जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रियांका गांधीना अटक, समर्थकांचे जोरदार आंदोलन सुरु

लखीमपुरात काय झालं होतं?

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rahul Gandhi Lakhimpur Kheri Visit: राहुल गांधी उद्या लखीमपूर खेरीला जाणार, प्रशासनाकडे मागितली परवानगी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAir Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget