Rahul Gandhi Lakhimpur Kheri Visit: राहुल गांधी उद्या लखीमपूर खेरीला जाणार, प्रशासनाकडे मागितली परवानगी
Rahul Gandhi Lakhimpur Kheri Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी लखीमपूर खेरीला भेट देणार आहेत. या संदर्भात काँग्रेसने प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

Rahul Gandhi Lakhimpur Kheri Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या लखीमपूर खेरीला भेट देणार आहेत. या संदर्भात, काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे की ज्याप्रमाणे टीएमसी नेत्यांना लखीमपूर खेरी घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती त्याप्रमाणे काँग्रेस नेत्यांना परवानगी द्यावी. राहुल गांधी अशावेळी लखीमपूर खेरीला भेट देण्याचा विचार करत आहे, जेव्हा त्यांची बहीण प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात आहे.
ताब्यात घेतल्यापासून राहुल गांधी सतत प्रियांका गांधी यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले आणि म्हटले की, "ज्याना ताब्यात घेतलंय ती घाबरत नाही, खरी काँग्रेसी आहे. हार मानणार नाही! सत्याग्रह थांबणार नाही. #FarmersProtest "राहुल गांधी यांनी सोमवारी ट्विट करत म्हटले होते, की "प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या धाडसाला घाबरतात. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू. #NoFear #लखीमपुर_किसान_नरसंहार''
जिसे हिरासत में रखा है, वो डरती नहीं है- सच्ची कांग्रेसी है, हार नहीं मानेगी!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 5, 2021
सत्याग्रह रुकेगा नहीं।#FarmersProtest
प्रियंका गांधी यांचे विधान
प्रियंका गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास सांगितले की, त्यांना सीतापूरच्या पीएसी आवारात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आले आहे आणि 38 तासानंतरही एकही कोणतीही प्राथमिकता दाखवण्यात आलेली नाही. प्रियांका गांधी म्हणाल्या की तिला आतापर्यंत कोणत्याही दंडाधिकारी किंवा न्यायिक अधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले नाही किंवा तिला तिच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. तिचे वकील सकाळपासून परिसरातील गेटवर उभे आहेत.
त्या म्हणाल्या, “मला अटक करताना माझ्यावर आणि माझ्या साथीदारांवर पूर्णपणे बेकायदेशीर बळाचा वापर कसा केला गेला आहे, याचा तपशील देत नाही. कारण, हे विधान केवळ हे स्पष्ट करण्यासाठी आहे की मला बेकायदेशीरपणे पीएसी परिसरात ठेवण्यात आले आहे’’
प्रियंका गांधी आणि दीपेंद्र हुड्डा यांना लखीमपूर खेरीकडे जाताना ताब्यात घेण्यात आले आणि सोमवार सकाळपासून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या म्हणाल्या की त्यांनी सोशल मीडियावरील एका पेपरचा काही भाग पाहिला ज्यात प्रशासनाने 11 जणांना नामांकित केले आहे आणि त्यापैकी आठजण असे होते जे त्याच्या अटकेच्या वेळी तिथं उपस्थित नव्हते.
रविवारी तिकोनिया गावात तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
