एक्स्प्लोर
'रोमँटिक रिलेशनशिप'मुळे लग्नाच्या दिवशीच शिक्षक जोडप्याची हकालपट्टी
"आमचं 30 नोव्हेंबरला लग्न होतं आणि त्याच दिवशी शाळेने आम्हाला नोकरीतून काढण्याचा आदेश दिला," असा आरोप दोघांनी केला आहे.
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या दिवशीच नोकरीवरुन काढण्यात आलं. त्यांच्या रोमान्सचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो, असं स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनाने दिलं आहे.
अनेक वर्षांपासून शाळेत कार्यरत
तारिक भट आणि सुमाया बशीर हे पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे रहिवासी आहेत. दोघेही पम्पोर मुस्लीम एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या बॉईज आणि गर्ल्स विंगमध्ये अनेक वर्षांपासून शिकवत होते.
"आमचं 30 नोव्हेंबरला लग्न होतं आणि त्याच दिवशी शाळेने आम्हाला नोकरीतून काढण्याचा आदेश दिला," असा आरोप दोघांनी केला आहे.
'लग्नाआधी रोमँटिक रिलेशनशिपमध्ये'
लग्नाआधी दोघे रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असल्याने त्यांना नोकरीतून कमी केल्याची माहिती शाळेचे संचालक बशीर मसुदी यांनी दिली आहे.
"ते रोमान्स करत होते, जे शाळेतील 2000 विद्यार्थी आणि 200 स्टाफ कर्मचाऱ्यांच्या हिताचं नव्हतं. याचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम झाला असता, असं बशीर मसुदी म्हणाले.
कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न
"कुटुंबीयांच्या सहमतीनेच आम्ही लग्न केलं आहे. काही महिन्यापूर्वीच आमच्या नात्याला सुरुवात झाली होती. शाळेच्या व्यवस्थापनाला याची माहिती होती. इतकंच नाही तर साखरपुड्यानंतर सुमायाने शाळेच्या स्टाफला पार्टीही दिली होती," असं तारिक भट म्हणाले.
बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही!
"आम्हाला बाजू मांडण्याची संधी का दिली नाही," अस प्रश्न तारिक भटने विचारला आहे. "लग्नासाठी आम्ही दोघांनी एक महिन्याआधी सुट्टीसाठी अर्ज दिला होता. शाळा व्यवस्थापनाने आमच्या सुट्ट्याही मंजूर केल्या होत्या. जर आम्ही रोमँटिक रिलेशनशिपमध्ये होतो, तर लग्न करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर तेव्हाच त्यांनी आमच्याकडून उत्तर का मागितलं नाही," असंही तारिक भट म्हणाला.
शाळेच्या कृत्यामुळे आमची प्रतिमा मलिन
"शाळा प्रशासनाच्या कृत्यामुळे आमची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जोडप्याने केला आहे. आम्ही कोणतंही पाप किंवा गुन्हा केलेला नाही," असं त्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement