Karnataka Assembly Election 2023 voting live updates : कर्नाटक निवडणुकीतील मतदान शेवटच्या टप्प्यात, 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे.
LIVE
Background
Karnataka Assembly Election 2023 Voting live updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) आज मतदान होणार आहे. मतदार कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार हे आज ठरवणार आहेत. आज (10 मे) सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं असून राज्यभरातील एकूण 58,545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात येत आहे. मतदानादरम्यान एकूण 75,603 बॅलेट युनिट (BU), 70,300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.
राज्यभरातील एकूण 5,31,33,054 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष मतदार तर 2,64,00,074 महिला मतदार आहेत. तसेच 4,927 इतक्या संख्येने इतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्यात 11,71,558 तरुण मतदार आहेत, तर 5,71,281 शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत आणि 12,15,920 मतदार हे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार
विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान पेटीत बंद होणार आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे उद्या ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.
सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही
कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे 13 मे रोजीच्या निकालावेळी समजेल.
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक निवडणुकीत 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान उडपी जिल्ह्यात
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक निवडणुकीत 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान
तर बेळगाव जिल्ह्यात 37.48 टक्के मतदान
सगळ्यात जास्त उडपी जिल्ह्यात 48 टक्के मतदान
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक निवडणुकीत 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान उडपी जिल्ह्यात
Karnataka Assembly Election Voting : कर्नाटक निवडणुकीत 1 वाजेपर्यंत 37.25 टक्के मतदान
तर बेळगाव जिल्ह्यात 37.48 टक्के मतदान
सगळ्यात जास्त उडपी जिल्ह्यात 48 टक्के मतदान
कर्नाटकमध्ये काँग्रेस 130-135 जागा जिंकेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास
लोकांना हे सरकार बदलायचे आहे. भ्रष्टाचार हटवून विकास घडवून आणणारे सरकार त्यांना हवे आहे. त्यामुळं काँग्रेस पक्ष सत्तेत यावा असे लोकांना वाटत असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने 130-135 जागा जिंकेल.