Karnataka Election 2023 : अबब! कर्नाटक सरकरमधील मंत्री एन. नागराजू सर्वांत श्रीमंत उमेदवार, जेमतेम शिक्षण घेऊन 1600 कोटींचे मालक
सत्ताधारी भाजपाकडून काल 17 एप्रिल रोजी मंत्री एन. नागराजू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी बंगळूरू जवळच असणाऱ्या होसकोटे विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
Karnataka Election 2023 : सध्या कर्नाटक विधानसभेचे (karnataka assembly election) बिगुल वाजले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून 20 एप्रिलपर्यत अर्ज दाखल करता येणार आहे. सध्या कर्नाटक सरकारमधील मंत्री एन. नागराजू (N Nagaraju) यांनी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज केल्यानंतर त्यांच्या संपत्तीवरून चर्चेत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी निवडणूक आयोगासमोर एकूण संपत्तीची माहिती देणं बंधनकारक असतं. अशातच 72 वर्षीय एन. नागराजू यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 1,609 कोटी इतकी प्रॉपर्टी असल्याचं जाहीर केलं आहे. या संपत्तीवरून ते सध्या सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.
सत्ताधारी भाजपाचे उमेदवार आहेत नागराजू
सत्ताधारी भाजपाकडून काल 17 एप्रिल रोजी मंत्री एन. नागराजू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी बंगळूरू जवळच असणाऱ्या होसकोटे विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. यादरम्यान त्यांनी निवडणूक प्रतिज्ञपत्रात शेतकरी आणि व्यावसायिक असल्याचं दाखवलं आहे. त्यांच्या उत्पन्नाचे साधन शेती, कौटुंबिक संपत्ती आणि व्यावसाय आहे. सध्या नागराजू यांच्याकडे 536 कोटींची चल संपत्ती असून 1,073 कोटी इतकी अचल संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आपल्या प्रतिप्रज्ञाप्रत्रात 98. 36 कोटी रूपयांची देणी असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्यांच्या पत्नी गृहणी असल्याचंही त्यांनी उल्लेख केला आहे.
सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत नागराजू
सध्या एन. नागराजून कनार्टक सरकारमध्ये मंत्रीपदावर असून ते विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांनी जून 2020 मध्ये विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. यादरम्यान त्यांनी पत्नी शांताकुमारीसोबत मिळून एकूण 1,220 कोटी इतकी संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं.
2018 मध्ये विधानसभा निवडणूकीत एन. नागराजू कॉंग्रेसकडून होसकोट विधासभा मतदारसंघातून विजयी उमदेवार होते. यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षाची साथ सोडली आणि भाजपात सामिल झाले. 2019 मध्ये कॉंग्रेस-जेडीसचं सरकार पडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या 17 आमदारांत एन. नागराजू यांचही नाव होतं. यानंतरच्या पोटनिवडणूकीत अपक्ष उमेदवार शरथ बचेगौडा यांच्याकडून ते पराभूत झाले होते. यानंतर अपक्ष शरथ बचेगौडा हे कॉंग्रेसमध्ये सामील झाले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बचेगौडा आणि मंत्री नागराजू यांच्या रंगदार लढत होणार आहे.
एन. नागराजू यांच्याकडे एकूण इतकी आहे प्रॉपर्टी
सध्या नागराजू यांच्याजवळ कॅश स्वरूपात 64 लाख 89 हजार 302 रूपये इतकी रक्कम असल्याचं जाहीर केलं आहे. तर त्याच्या पत्नी एन. शांताकुमारी यांच्याजवळ कॅशमध्ये 34 लाख 29 हजार 445 रूपये इतकी संपत्ती आहे. तसेच, नागराजू यांच्याकडे बँकेतील सेव्हिंग अकाउंटवर 20 कोटी 12 लाख 31 हजार 11 रूपये तर त्यांच्या पत्नी शांताकुमारी यांच्या खात्यावर 6 कोटी 16 लाख 47 हजार 987 रूपये इतके डिपॉझिट जमा आहे. तसेच, त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात कोटींमध्ये रक्कम जमा आहे.