जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू
बसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले आहेत.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी आहेत. जम्मू काश्मीच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारी येथे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.
अपघातग्रस्त बस केशवनहून किश्तवाड येथे निघाली होती. मात्र सकाळी 7.30 च्या दरम्यान दरीत कोसळली. बसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले असल्याचं समोर आलं आहे.
Extremely saddened to learn about the loss of lives due to a road accident in Kishtwar, Jammu & Kashmir. My deepest condolences to the families of those who lost their loved ones. I pray of the speedy recovery of those injured.
— Amit Shah (@AmitShah) July 1, 2019
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "जम्मू काश्मीरमधील बस दुर्घटनेबद्दल मी फार दु:खी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो. तर जखमीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो", असं अमित शाह यांनी ट्वीट केलं आहे.
VIDEO | माझा 20-20 | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा