एक्स्प्लोर
Advertisement
ISRO कडून लष्कराच्या आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) ने गुरुवारी रात्री नवा इतिहास रचला आहे. इस्रोने गुरुवारी रात्री उशीरा श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जगातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्वात लहान उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केले.
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) ने गुरुवारी रात्री नवा इतिहास रचला आहे. इस्रोने गुरुवारी रात्री उशीरा श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जगातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्वात लहान उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केले. त्यासोबत भारतीय लष्कराच्या उपग्रहाचेही प्रक्षेपण केले आहे.
इस्रोच्या पीएसएलव्ही-सी 44 रॉकेटने गुरुवारी रात्री 11.37 वाजता श्रीहरीकोटा येथून भारतीय लष्कराचा उपग्रह मायक्रोसॅट-आर आणि इस्रोच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह कलामसॅटला घेऊन अंतराळात उड्डाण केले. त्यानंतर ठरलेल्या वेळेत पीएसएलव्ही-सी 44 रॉकेटने लष्कराच्या उपग्रहाला त्याच्या कक्षेत प्रस्थापित केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलामसॅट या उपग्रहालादेखील यशस्वीपणे ठरावीक कक्षेत सोडले. पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) रॉकेटचे हे 46 वे उड्डाण होते. इस्रोने या उपग्रहांचे लॉन्चिंग मोफत केले आहे. पहिल्यांदा इस्रोने एखाद्या भारतीय संस्थेचा उपग्रह लॉन्च केला आहे. याआधी इस्रोने स्वतःच्या, तसेच इतर देशांच्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.
???????? Mission Accomplished! ???????? Thank You for your support!#PSLVC44 #MicrosatR#KalamsatV2 pic.twitter.com/uNqK8vf74L — ISRO (@isro) January 24, 2019
Andhra Pradesh: #ISRO launches #PSLVC44 mission, carrying #Kalamsat and #MicrosatR from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. pic.twitter.com/yBI7xlKARK
— ANI (@ANI) January 24, 2019
???????? #ISROMissions ????????
ISRO is open to all students of India. Bring to us your satellites and we will launch it for you. Let's make India into a science-fairing nation. Dr K Sivan #PSLVC44#MicrosatR#Kalamsat#SamwadwithStudents #SwS pic.twitter.com/plfKbNE7U0 — ISRO (@isro) January 24, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement