एक्स्प्लोर

ISRO PSLV : इस्रोची नवी 'गगन भरारी', PSLV C54 रॉकेट लाँच, ओशनसॅट-3 सह 8 नॅनो सॅटेलाइटचं प्रक्षेपण

ISRO PSLV C54 Launch : इस्रोकडून ओशनसॅट-3 सह 8 नॅनो सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी54-इओएस-06 रॉकेटने ( PSLV-C54-ESO-06) उड्डाण केलं आहे.

ISRO Launch PSLV : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organisation ) म्हणजे इस्रोने ( ISRO ) आणखी एक 'गगन भरारी' घेतली आहे. आज PSLV-C54 रॉकेट लाँच करण्यात आलं आहे. इस्रोकडून ओशनसॅट-3 (Oceansat 3) सह 8 नॅनो सॅटेलाइटचं  (Nano Satelites) प्रक्षेपण करण्यात आलं आहे. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी54-इओएस-06 रॉकेटने ( PSLV-C54-ESO-06) उड्डाण केलं आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट-3 ( Oceansat 3 ) उपग्रह आणि 8 नॅनो म्हणजे लहान उपग्रहांचं प्रक्षेपण ( Nano Satellite Launch ) करण्यात आलं आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट लाँचरची ही 24 वी मोहिम आहे.

ओशनसॅट 3 (Oceansat 3) 

ओशनसॅट-3 (Oceansat 3) हा 1000 किलो वजनाचा उपग्रह आहे. हा उपग्रह समुद्र आणि पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणाचा अभ्यास करणार आहे. याशिवाय भारताच्या सागरी क्षेत्रासह मित्र देशांच्या सागरी भागातील क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषणाची तपासणी करण्यास मदत करेल. या सॅटेलाईटमुळे संभाव्य चक्रीवादळाची माहिती मिळू शकेल, त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.

PSLV-C54 रॉकेटमधून 'EOS-06 (Oceansat-3) आणि आठ छोटे सॅटेलाईट अंतराळात सोडले जातील. यामध्ये पिक्सेलमधून आनंद आणि भूटानसॅट, ध्रुव अंतराळमधून दोन थायबोल्ट तर स्पेसफ्लाइट युएसएमधून चार अशा एकूण आठ छोट्या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामध्ये भूटानसॅट (BhutanSat), थायबोल्ट-1 (Thybolt-1), थायबोल्ट-2 (Thybolt-2), आनंद (Anand) आणि चार ॲस्ट्रोसॅट (Astrocast) या छोट्या उपग्रहांचा समावेश आहे.

भूटानसॅट (BhutanSat / ​​INS-2B)

ओशनसॅट व्यतिरिक्त या प्रक्षेपणात आठ नॅनो सॅटेलाईट म्हणेज छोटे उपग्रहही अंतराळात पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपग्रह भूटानसॅट (BhutanSat / ​​INS-2B) आहे. भूतानसॅट हा भारत-भूतानचा संयुक्त उपग्रह आहे. नॅनो हा उपग्रह आहे. हा उपग्रह जमीन, रस्ते, रेल्वे ट्रॅक, पूल यासंबंधित माहिती गोळा करेल.

इस्रोची मोठी मोहीम

इस्रोची ही मोठी मोहिम आहे. यामध्ये हे रॉकेट उपग्रहांना दोन कक्षेत घेऊन जाणार आहे. उड्डाणानंतर 20 मिनिटांनी ओशनसॅट उपग्रह पृथ्वीपासून 742 किमी उंचीवर सोडला जाईल.
 शास्त्रज्ञ याला आतापर्यंतच्या सर्वात लांब मोहिमांपैकी एक मानत आहेत. यामध्ये रॉकेट उपग्रहाला दोन कक्षेत घेऊन जाईल. प्रक्षेपणाच्या 20 मिनिटांनंतर, ओशन-सॅट पृथ्वीपासून 742 किमी उंचीवर सोडले जाईल. त्यानंतर 516 ते 528 किमी अंतरावर इतर उपग्रह अवकाशात सोडले जातील. 

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget