ISRO Launch PSLV: इस्रो आज लाँच करणार 8 नॅनो सॅटेलाइट आणि ओशनसॅट-3; काय आहेत वैशिष्ट्ये
ISRO Launch PSLV: इस्रोकडून आज उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.Oceansat 3 आणि आठ नॅनो उपग्रहांचे प्रक्षेपण आज सकाळी होणार आहे.
ISRO Launch PSLV: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतेच खाजगी क्षेत्रातील मोहिमेत इतिहास रचल्यानंतर पुढील PSLV-C54/ EOS-06 या मोहिमेसाठी सज्ज आहे. इस्राोकडून ओशन सॅट सीरिजमधील तिसऱ्या जनरेशनमधील ओशनसॅट-3 (Oceansat-3) सह 8 नॅनो सॅटेलाइटही लाँच करणार आहे. आज सकाळी 11.46 वाजता श्रीहरिकोटाहून याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
Oceansat सीरिजच्या सॅटेलाइटचा अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट असा आहे. समुद्र विज्ञान आणि वातावरणाच्या अभ्यासासाठी हे सॅटेलाइट आहे. त्याशिवाय, सॅटेलाइट समुद्रातील हवामानाचा पूर्व अंदाज व्यक्त करण्यास सक्षम आहे. त्यामुळे संभाव्य चक्रीवादळाची माहिती मिळू शकेल आणि होणारे मोठे नुकसान टाळता येऊ शकेल.
आज इस्रोकडून Oceansat-3 लाँच करण्यात येणार आहे. Oceansat सीरिजमधील Oceansat-1 उपग्रहाला 26 मे 1996 रोजी लाँच करण्यात आले होते. त्यानंतर Oceansat -2 या उपग्रहाला 23 सप्टेंबर 2009 रोजी लाँच करण्यात आले. वर्ष 2016 मध्ये Oceansat 2 मधील स्कॅनिंग स्केटरोमीटरमध्ये बिघाड झाल्याने ScatSat-1 लाँच केले. आता Oceansat सीरिजमधील Oceansat-3 आज लाँच करण्यात येणार आहे. या उपग्रहात ओशन कलर मॉनिटर OCM3, सी सर्फेस टेम्परेचर मॉनिटर (SSTM), ku-band स्केट्रोमीटर (SCAT-3) आणि ARGOS सारखे पॅलोड आहेत.
किती तासात मोहीम संपणार?
EOS-06 (Oceansat-3) शिवाय, आठ नॅनो उपग्रहामधील पिक्सेलमधून आनंद, इस्रो भूटानसॅट, ध्रुव अंतरिक्षमधून दोन थायबोल्ट आणि स्पेसफ्लाइट यूएसमधून चार एस्ट्रोकास्टचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ही संपूर्ण मोहीम जवळपास 8200 सेंकद म्हणजे दोन तास 20 मिनिटांची आहे. ही पीएसएलव्हीची मोठी मोहीम असणार आहे. या दरम्यान, प्राथमिक उपग्रह आणि नॅनो उपग्रह दोन वेगवेगळ्या सोलर सनक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये (एसएसपीओ) प्रक्षेपित केले जाणार आहेत.
पहिलं खासगी रॉकेट विक्रम-S लाँच
काही दिवसांपूर्वीच इस्रोने ऐतिहासिक कामगिरी केली. इस्रोने पहिले खासगी रॉकेटचे प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटामधून आज इसरोने पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण केलं आहे. विक्रम-सबऑरबिटल रॉकेट असं या रॉकेटचं नाव आहे. स्काईरूट एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड या खासगी कंपनीनं या रॉकेटची निर्मिती केली. 550 किमी वजनाचं हे सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट होते. उड्डाण घेतल्यानंतर रॉकेटने सुमारे 100 किलोमीटरपर्यंतची झेप घेतली आणि त्यानंतर समुद्रात कोसळले.