एक्स्प्लोर

देशातले रस्ते मृत्यूचा सापळा, पायी चालणाऱ्या 56 जणांचा दररोज मृत्यू

मृत्यूच्या सर्वाधिक घटनांमध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. देशात 2017 मध्ये 20 हजार 457 पादचाऱ्यांनी रस्त्यावरुन चालताना आपला जीव गमावला आहे.

मुंबई : चांगले रस्ते आणि मोकळे फुटपाथ हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा नोंदवलं आहे. हायकोर्टाने विविध खटल्यांवेळी नोंदवलेलं हे मत किती महत्त्वाचं आहे आणि याकडे आपल्या देशात किती दुर्लक्ष होतंय, याचं वास्तव दाखवणारी एक आकडेवारी समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रही आघाडीवर आहे. देशातले रस्ते पायी चालणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. 2017 या वर्षात देशातल्या रस्त्यांवर दररोज 56 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या या घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे. 2014 मध्ये अशा घटनेत 12 हजार 330 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर 2017 मध्ये 20 हजार 457 पादचाऱ्यांनी रस्त्यावरुन चालताना आपला जीव गमावला आहे. देशातले रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित आहेत. कारण, या रस्त्यांवर बचावात्मक संसाधनांची कमी आहे. या मृत्यूच्या सूचीमध्ये सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांनाही ठेवण्यात आलं आहे आणि सरकारी आकडेवारीनुसार देशात गेल्या एका वर्षात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वारांचा रस्त्यावर मृत्यू झाला आहे. कोणत्या राज्यात स्थिती जास्त खराब? रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडूची स्थिती सर्वात खराब आहे. गेल्या वर्षात तामिळनाडूमध्ये दररोज 3507 जणांनी आपला जीव गमावलाय. तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, जिथे 1831 जणांनी जीव गमावला. आंध्र प्रदेशमध्ये 1379 जणांचा जीव गेला आहे. दुचाकीस्वारांच्या सर्वाधिक मृत्यूमध्येही तामिळनाडूची परिस्थिती वाईट आहे. तामिळनाडूत 6329, उत्तर प्रदेशात 5699 आणि महाराष्ट्रात 4569 दुचाकीस्वारांचा जीव गेला. विकसित देशांच्या तुलनेत आपल्या देशामध्ये पायी चालणाऱ्यांविषयी वाहनचालकांच्या मनात आदर कमी आहे, असं नुकतंच या आकडेवारीवर बोलताना परिवहन विभागाच्या सचिवांनी म्हटलं होतं. देशातील रस्त्यावर गाडी पार्क करणं किंवा छोट्या दुकानदारांकडून अतिक्रमण करण्याच्या घटना सर्वसाधारण झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या के. के. कपिला यांच्या मते, रस्त्यावर सर्वाधिक मृत्यू होण्याचा हा प्रकार दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्येही होतो. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते कसे निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी स्वतंत्र रस्ते ठेवण्यावर भर देणं गरजेचं असल्याचंही कपिला यांनी सांगितलं. जाणकारांच्या मते, वाहनांमधील आधुनिक ब्रेक सिस्टम अँटी ब्रेकिंगच्या माध्यमातूनही अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. अँटी ब्रेकिंगमुळे गाडी जागेवर थांबते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्घटना टाळली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget