(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 12 फेब्रुवारीपर्यंत 'या' गाड्या करण्यात आल्या आहेत रद्द
Indian railways : जबलपूर विभागातील कटनी-सिंगरौली रेल्वे विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील गाड्या 10 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.
Indian railways : रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 29 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वाढती थंडी आणि धुक्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. परंतु, आता दुहेरीकरणाच्या कामामुळे 12 फेब्रुवारीपर्यंत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.
रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर विभागातील कटनी-सिंगरौली रेल्वे विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील गाड्या 10 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये सल्हाना, पिपरिया कलान आणि खन्ना बंजारी सारख्या अनेक स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय धनबाद विभागात 12 फेब्रुवारीपर्यंत दुहेरीकरण आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम सुरू राहणार आहे.
या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
भोपाळ-सिंगरौली एक्स्प्रेस (22165) 29 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
सिंगरौली-भोपाळ एक्स्प्रेस (22166) 1 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
सिंगरौली – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (22167) 30 जानेवारी आणि 6 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
हजरत निजामुद्दीन-सिंगरौली एक्स्प्रेस (22168) 31 जानेवारी आणि 7 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
हावडा-जबलपूर एक्स्प्रेस (11448) 8 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान रद्द झाली आहे.
जबलपूर-हावडा एक्स्प्रेस (11447) 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
भोपाळ-सिंगरौली एक्स्प्रेस (22165) 5 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी रोजी रद्द झाली आहे.
सिंगरौली-भोपाळ एक्सप्रेस (22166) 8 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी रोजी रद्द असेल.
सिंगरौली-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (22167) 6 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी रोजी रद्द राहील.
हजरत निजामुद्दीन-सिंगरौली एक्स्प्रेस (22168) 7 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी रद्द राहील.
मदार जंक्शन-कोलकाता एक्सप्रेस (19608) 7 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
कोलकाता-मदार जंक्शन एक्सप्रेस (19607) 10 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
अहमदाबाद-कोलकाता एक्सप्रेस (19413) 9 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
कोलकाता-अहमदाबाद एक्सप्रेस (19414) 12 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
हावडा-भोपाळ एक्सप्रेस (13025) 7 फेब्रुवारी रोजी रद्द आहे.
भोपाळ-हावडा एक्स्प्रेस (13026) 9 फेब्रुवारी रोजी रद्द असेल.
निम्म्यापर्यंत रद्द केलेल्या गाड्या
सिंगरौली-पाटणा एक्सप्रेस (13343) 29 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान सिंगरौलीऐवजी चोपनहून पाटण्यासाठी सुटेल.
पाटणा-सिंगरौली एक्स्प्रेस (13350) 28 जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान सिंगरौलीऐवजी चोपणपर्यंत धावेल.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 35 हजार 532 रुग्ण, 871 जणांचा मृत्यू
- धक्कादायक... PUBGचं घातकी व्यसन! 14 वर्षाच्या मुलानं अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवलं