पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार
पुणे : 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
![पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार pune school breaking schools and colleges will open from 1st February Vaccination will be done in school पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/26/e85604b378579b8fb31e4931ff53cf99_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालक घेतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारने 23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडे सोपवला होता. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून शाळा सुरुही झाल्या. मात्र, पुण्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. त्यानंतर आता पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार यांनी सांगितले की, ''शाळा जरी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसेल. पालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. एकदा घडी नीट बसली की मग याबाबत पुढचा निर्णय घेण्यात येईल. पहिली ते आठवी वर्गाची शाळा अर्धा दिवस असेल. दुपारच्या सुट्टीनंतर मुलांनी घरी जाऊन डबा खायचा आहे. तर, नववी इयत्तेपासून पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील.''
15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. फिरत्या मोबाईल व्हॅनमधून लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. दरम्यान 10 आणि 12 च्या परिक्षांबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, ''10 आणि 12 च्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. याबाबतचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतील.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 35 हजार 532 रुग्ण, 871 जणांचा मृत्यू
- Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
- Bloomberg Index : वॉरन बफेटने मार्क झुकरबर्गला टाकलं मागे, एलन मस्क कितव्या स्थानी? जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)