धक्कादायक... PUBGचं घातकी व्यसन! 14 वर्षाच्या मुलानं अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवलं
Pakistan : पाकिस्तानमध्ये PUBG गेमच्या व्यसनामुळे एका 14 वर्षांच्या मुलाने आपल्या कुटुंबाचा बळी घेतला आहे. गेम खेळण्यास मनाई केल्याने मुलाने आईसह तीन भाऊ-बहिणींवर गोळ्या झाडल्या.
Pakistan : आजच्या काळात तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे मानवी विकासात मोठी समस्या निर्माण होत आहे. एकीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठमोठे शोध मानवी समाजाला पुढे नेत असतानाच त्यातील अनेक उणिवाही समोर आल्या आहेत. आजच्या काळात मोबाईलचा विकास जितका झपाट्याने होत आहे, तितकीच तरुणांची त्याकडे असलेली ओढही वाढली आहे. मोबाईल फोनवर व्हिडीओ गेम्स आल्याने तरुणांमध्ये याची क्रेझ आणखीनच वाढली आहे.
सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या राजधानीत PUBG या ऑनलाईन गेममुळे एका मुलाने आपल्या संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षांचा मुलगा मोबाईलमध्ये PUBG खेळण्यात मग्न असायचा. या कारणामुळे त्याची आई त्याच्यावर नेहमी रागावायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षाचा मुलगा आपला बहुतेक वेळ मोबाईलमध्ये पबजी खेळण्यात व्यस्त असायचा. मुलाची आई मुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिवीगाळ करायची. याला कंटाळून मुलाने पिस्तुलाने आई आणि भावंडांची गोळ्या झाडून हत्या केली.
पोलिसांनी माहिती दिली आहे की, 45 वर्षीय आरोग्य कर्मचारी नाहिद मुबारक यांचा 22 वर्षीय मुलगा तैमूर आणि 17 आणि 11 वर्षांच्या दोन मुलींसह लाहोरच्या केहना भागात गेल्या आठवड्यात मृतावस्थेत आढळून आले होते. या प्रकरणी तपासात सध्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील एकमेव जिवंत 14 वर्षांचा मुलगा या हत्येसाठी दोषी आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, नाहिद घटस्फोटित होती आणि तिचा मुलग अभ्यासात लक्ष देत नाही आणि PUBG खेळण्यात जास्त वेळ घालवतो म्हणून ती अनेकदा त्याला शिवीगाळ करायची. घटनेच्या दिवशीही नाहिद तिच्या मुलाला PUBG खेळण्यासाठी ओरडली. त्यामुळे मुलगा त्रस्त झाला. त्याने इतर सर्वजण झोपेत असताना आईच्या कपाटातून पिस्तूल काढले आणि झोपेतच आई आणि तीन भाऊ बहिणींवर गोळ्या झाडल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
- Bloomberg Index : वॉरन बफेटने मार्क झुकरबर्गला टाकलं मागे, एलन मस्क कितव्या स्थानी? जाणून घ्या...
- Shehnaaz Gill Photos : गुलाबी रंगाच्या साडीत शहनाज गिलच्या घायाळ करणाऱ्या अदा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha