Indian Army Day 2022: नवा गणवेश, नवा जोश; भारतीय लष्कराला मिळाला कॉम्बॅट युनिफॉर्म
Indian Army Day 2022: आज भारतीय लष्कर दिवस साजरा केला जात असताना भारतीय लष्कराला नवा गणवेश मिळाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश आजपासून बदललाय. हवामानापासून संरक्षण व्हावं आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्याचा फायदा व्हावा असा नवा पोशाख तयार करण्यात आला आहे. आर्मी डे परेडदरम्यान नव्या गणवेशाचा पहिला लूक पाहायला मिळाला. मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे केली आहे. शनिवारी देशात आर्मी डे साजरा करत असताना जवानांना ही भेट देण्यात आल्याचं सांगितलं जातं.
देशातील वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, जसं वाळवंट, जंगल, पर्वत या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन या मल्टी टेरेन पॅटर्न यूनिफॉर्म तयार करण्यात आला आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने नव्या कॉम्बॅट युनिफॉर्मचा अभ्यास करण्यासाठी एक समिती तयार केली होती. या समितीच्या शिफारसीनंतर हा नवीन युनिफॉर्म बनवण्यात आला आहे. नवा युनिफॉर्म हा अमेरिकन लष्कराच्या धरतीवर तयार करण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: Indian Army’s Parachute Regiment commandos marching during the Army Day Parade in the new digital combat uniform of the Indian Army. This is the first time that the uniform has been unveiled in public. pic.twitter.com/j9D18kNP8B
— ANI (@ANI) January 15, 2022
या युनिफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे याचं वजन तुलनेनं कमी असून ते जास्त मजबूत आहे. त्यामुळे जवानांना अधिक आरामदायी वाटेल असा लष्कराकडून दावा करण्यात आला आहे.
आतापर्यंत तीन वेळा भारतीय लष्कराचा गणवेश बदलण्यात आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले. नंतर 1980 मध्ये आणखी एक बदल करण्यात आला आणि त्याला बॅटल ड्रेस असं नाव देण्यात आलं. शेवटचा बदल 2005 मध्ये करण्यात आला. सरकारने CRPF आणि BSF च्या युनिफॉर्मसाठी आर्मी डीपी बॅटल ड्रेस वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या :