एक्स्प्लोर

Covid19 Updates : देशात 243 नवीन रुग्ण; भारतातील कोरोना परिस्थिती काय? वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे

Coronavirus In India : चीन, जापान आणि दक्षिण कोरियासोबत सहा देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने नव्या सूचना जारी केल्या आहेत.

Coronavirus Cases in India Today : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती दिलासादायक आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने आज नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 243 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशी देशात 268 कोरोनाबाधित सापडले होते. तुलनेने आज कोरोना रुग्णांची संख्या 25 ने कमी झाली आहे. 

परदेशातून मुंबईत आलेला एका प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. मुंबई विमानतळावर 28 डिसेंबरला परदेशातून 97 फ्लाईट आल्या आहेत. ज्यामध्ये 16,993 प्रवासी होते. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार दोन टक्के प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट मुंबई विमानतळावर करण्यात आली. यामध्ये एकूण 377 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली त्यातील 350 प्रवाशांचे  आरटीपीसीआर अहवाल हे प्राप्त झाले असून यामध्ये एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा समोर आला आहे.

भारतातील कोरोना परिस्थिती काय? वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे

  1. भारत सरकारने 1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. या देशांसमोर येणाऱ्या लोकांना त्यांचा कोविड निगोटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. प्रवाशांना कोविड चाचणी भारतात प्रवास केल्यानंतर 72 तासांच्या आत करावी लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
  2. भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची रँडम कोविड चाचणी केली जात आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याआधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व विमानतळांवर या सूचनांचे पालन घेत खबरदारी घेतली जात आहे.
  3. जुलै महिन्यापासून देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या BF.7 सबव्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. गुजरात आणि ओदिसा येथे हे रुग्ण सापडले. पाचही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती.
  4. मुंबई विमानतळावर एक आणि चेन्नई विमानतळावर दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. तर त्याआधी दुबईहून चेन्नईला परतलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित आहेत. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठ ,रव्तायण्यात आले आहेत.
  5. केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारतातसाठी पुढचे 40 दिवस फार महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात नागरिकांनी योग्य खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा देशात पुन्हा कोरोनाची लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
  6. जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. या देशांतील बहुतेक कोविड प्रकरणांसाठी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे उप-प्रकार BF.7 (BF.7) जबाबदार आहेत.
  7. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 243 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात सध्या 3,609 कोरोना सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
  8. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी फार्मा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारी औषध आणि ऑक्सिजन साठा याबाबत चर्चा केली आणि काही मार्गदर्शक सूचना दिल्या.
  9. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी फार्मा कंपन्यांना जागतिक औषध पुरवठा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यासोबतच एपीआयचे उत्पादन आणि उपलब्धता यासोबतच कोविड व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या निर्मितीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
  10. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी फार्मा कंपन्यांना किरकोळ औषधांचा पुरवठा, कोविड-19 औषधांसह सर्व औषधांचा पुरेसा साठा आणि उपलब्धता तपासण्यास सांगितले आहे.
  11. केंद्र सरकारच्या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, फार्मा सचिव सुश्री एस अपर्णा, एनपीपीएचे अध्यक्ष कमलेश पंत, भारताचे औषध नियंत्रक जनरल डॉ व्हीजी सोमाणी आणि औषध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget