(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Coronavirus Update : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच; 24 तासांत 2 लाख नवे रुग्ण, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 लाखांच्या पार
India Coronavirus Update : आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,00,739 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 1038 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याआधी मंगळवारी 184372 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण भारतात आढळून येत आहेत. कोरोनाची लागण झालेल्यां रुग्णांचा आकडा आता दोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,00,739 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 1038 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, 93,528 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी मंगळवारी 184372 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
देशाची कोरोना स्थिती :
एकूण कोरोना रुग्ण : एक कोटी 40 लाख 74 हजार 564
एकूण डिस्चार्ज : एक कोटी 24 लाख 29 हजार 564
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 14 लाख 71 हजार 877
एकूण मृत्यू : 1 लाख 73 हजार 123
एकूण लसीकरण : 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 डोस देण्यात आले
पूर्ण महाराष्ट्रात 15 दिवसांचा कर्फ्यू लागू
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. आज ब्रेक द चेन (Break The Chain) या निर्बंधाचा पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.
राज्यात काल 58,952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 39,624 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. राज्यात काल (बुधवारी) 58 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 39 हजार 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 29 लाख 05 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सद्यस्थिताला एकूण 6 लाख 12 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.64 टक्के आहे.
भारतात लसीकरणाचा उत्सव
देशात 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाचा उत्सवाची सुरुवात झाली आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 कोरोना लसीचे डोस दिले जातात. गेल्या 24 तासांत 33 लाख 13 हजार 848 लसीचे डोस देण्यात आले आहेत. लसीचा डोस देण्याचं अभियान 13 फेब्रुवारी सुरु झालं होतं. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व लोकांचं लसीकरण केलं जाऊ शकतं.
देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.24 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट जवळपास 89 टक्के आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जगभरात भारत तिसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोना बाधितांच्या संख्येत भारत जगभरात दुसऱ्यास्थानी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Break The Chain : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू, आज निर्बंधांचा पहिला दिवस; काय सुरु, काय बंद?
- राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री
- Maharashtra Corona Curfew: कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Maharashtra Lockdown: महत्वाची बातमी! एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही, मात्र...