एक्स्प्लोर

भारत बांगलादेश सीमेवर घुसखोरी करणाऱ्या चीनच्या हेराला BSF ने केली अटक

हांन जुनवाई नावाच्या चीनच्या नागरिकाला भारत बांगलादेश बॉर्डरवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना  BSF ने अटक केली आहे. या हेराच्या अटकेनंतर अतिशय मोठे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत

नवी दिल्ली : बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (BSF) ने हांन जुनवाई नावाच्या चीनच्या नागरिकाला भारत बांगलादेश बॉर्डरवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे. या हेराच्या अटकेनंतर अतिशय मोठे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. गेल्या दोन वर्षात 1300 भारतीय  सिमकार्ड हान याने खोटे कागदपत्र देऊन विकत घेतले आणि चीनला पाठवले आहेत. त्याचा उपयोग भारतात सायबर अटॅक आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला गेला आहे. 

चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतात वरचेवर सायबर हल्ले होतात आणि या हल्ल्यामागे कुठे ना कुठे चीनचा हात असतो हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. बीएसएफने हांन जुनवाई नावाच्या एका चायनीज हेराला अटक केली आहे, जो भारत बांगलादेश सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. 

हांन जुनवाईने दोन वर्षात 1300 भारतीय सिम कार्ड चीनला पाठवले आहेत. हांनने हे सिम कार्ड खोटे कागदपत्र देऊन विकत घेतले होते आणि अंडर गारमेंट्समध्ये लपून तो हे सिम कार्ड चीनला पाठवायचा. इतकंच नाही तर जेव्हा बीएसएफने त्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरण सुद्धा सापडली.

काही दिवसांपूर्वी हांन जुनवाईचा बिझनेस पार्टनर असलेला सन जियांगला लखनऊ एटीएसकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपास यंत्रणांकडून हां जूनवाईचा शोध सुरू होता. त्याला पकडण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करण्यात आली होती. एखाद्या भारतीय नंबरवरून जर फोन आला तर सहजासहजी संशय येत नाही आणि याचाच फायदा घेण्यासाठी भारतीय सिम कार्ड चा वापर केला जात होता.

सायबर तज्ञ आणि अॅडव्होकेट प्रशांत माळी यांच्या मते, कोविड काळामध्ये जेव्हा सगळे लोक आपल्या घरी होते आणि ऑनलाइन चलन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्या वेळी अनेकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या सिम कार्डचा वापर करून अनेक छोट्या-मोठ्या आर्थिक फसवणूकी सुद्धा केल्या गेल्या. ज्याची तक्रार कधीच नोंदवली जात नाही. 

या हेराकडे प्राथमिक तपास केल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. अधिक तपास केल्यास मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चीन आता इंटरनेटच्या माध्यमातून घुसखोरी करतंय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.. मात्र या हॅकर्सना आळा घालण्यासाठी आता तपास यंत्रणाही सज्ज झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget