एक्स्प्लोर
आधी डिसोझा, आता गावकर, पर्रिकर सरकारविरोधात नाराजीसत्र सुरुच
गोव्यातील सांगे मतदारसंघातून २०१२ साली निवडणूक लढवणारे प्रसाद गावकर तिसऱ्या स्थानावर होते तर २०१७ साली त्यांनी एक हजार मतांच्या आघाडीने भाजपच्या उमेदवारावर विजय मिळवला होता.

पणजी : 20 वर्षे निष्ठेने काम करून देखील महीनाभर आजारपणामूळे कामापासून दूर राहिलो म्हणून मंत्रिमंडळातून वगळल्याबद्दल आश्चर्य वाटते, अशा स्पष्ट शब्दात माजी नगरविकस मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानतंर आता पर्रिकर सरकारला पाठिंबा देणाऱ्या सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करून सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.
मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अपक्ष आमदार या नात्याने पाठिंबा देणारे आमदार गावकर यांनी सरकारकडून विकासकामांना चालना मिळत नसल्याचा आरोप यावेळी केला.
सांगे मतदारसंघातून २०१२ साली निवडणूक लढवणारे प्रसाद गावकर तिसऱ्या स्थानावर होते तर २०१७ साली त्यांनी एक हजार मतांच्या आघाडीने भाजपच्या उमेदवारावर विजय मिळवला होता. पर्रीकर सरकारला नंतर पाठिंब्याचे पत्र देणाऱ्या गावकर यांना वनविकास महामंडळाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. परंतु गेल्या दीड वर्षात महामंडळामार्फत कोणतीही विकासकामे झालेली नाहीत तसेच कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत त्यांनी आज अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीत आमदार गावकर यांनी कृषिमंत्री विजय सरदेसाई यांच्या जी-६ गटामार्फत सरकारकडे भक्कम खात्याची, तसेच कायमस्वरुपी तोडग्याची मागणी केली होती. परंतु, भाजपचे आमदार मिलिंद नाईक व निलेश काब्राल यांची मंत्रिपदी वर्णी लावली आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावरही आमदार गावकर यांनी बहिष्कार घातला होता. आता वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करून आमदार गावकर यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
