Rajasthan, Bharatpur : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात वायू सेनेचं विमान कोसळलं; हवेत स्फोट होऊन अपघात
Rajasthan, Bharatpur : राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथून उड्डाण केले होते
Rajasthan, Bharatpur : राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथून उड्डाण केले होते आणि भरतपूर जिल्ह्यातील उछैन भागात हा अपघात झाला. जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने कोसळली. त्यामुळे एकाच दिवसात तीन विमानांचा अपघात झाला आहे.
#WATCH | Rajasthan, Bharatpur | Wreckage of jet seen. Earlier report as confirmed by Bharatpur District Collector Alok Ranjan said charter jet, however, defence sources confirm IAF jets have crashed in the vicinity. Therefore, more details awaited. pic.twitter.com/005oPmUp6Z
— ANI (@ANI) January 28, 2023
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या अपघातानंतर पायलट बाहेर पडला आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी पथके आली आहेत. भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. येथे काही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान हवाई दलाचे आहे की लष्कराचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. भरतपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या हे लहान संरक्षण विमान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून स्पष्टता नाही. त्याचा आकाशातच स्फोट झाला होता, आता त्यात कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही याची संपूर्ण चौकशी सुरू आहे.
मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 विमान कोसळले
मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने (Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crashed near Morena) कोसळली. घटनेनंतर माहिती देताना मुरैनाचे जिल्हाधिकारी म्हणाले की, जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले. या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की, आणखी काही कारणामुळे अपघात झाला याची चौकशी केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या