एक्स्प्लोर

सतेज पाटीलच कोल्हापूरचे पालकमंत्री होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 8 जानेवारी रोजी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.

नवी दिल्ली : नवी दिल्ली : महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्वीकारणार नाहीत. "काँग्रेसचे 12 मंत्री मंत्रीमंडळात आहेत, 12 पालकमंत्रीपद मिळणार नसतील तर आमच्या सहकाऱ्यांना संधी देण्यासाठी मी पालकमंत्रीपद स्वीकारणार नाही, असं म्हटलेलं होतं, तीच भूमिका कायम आहे," असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. "मी प्रांताध्यक्ष आहे, मी मागे थांबेन, आमच्या सहकाऱ्यांपैकीच एक जण तिथे अॅडजस्ट होऊ शकतो," असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना हे पद मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काय आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, नगर, सोलापूर या सर्व जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्यात केवळ कोल्हापूर हा एकमेव जिल्हा काँग्रेसच्या वाट्याला आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, काँग्रेसचे सतेज पाटील, शिवसेनेच्या कोट्यातून अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर असे तीन मंत्री आहेत. पण यापैकी कुठल्याच स्थानिक नेत्याला हे पालकमंत्रीपद दिलं नाही. हसन मुश्रीफ यांना अहमदनगर तर बाळासाहेब थोरातांना कोल्हापूर अशी अदलाबदल करण्यात आली. सतेज पाटील यांना भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे ज्या अर्थी बाळासाहेब थोरात हे आता पालकमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, त्याअर्थी हे पद स्थानिक नेते सतेज पाटील यांना देऊन काँग्रेस जिल्ह्यात पक्ष मजबूतीची पावलं उचलू शकतं. काँग्रेसच्या वाट्याला 36 पैकी 11 पालकमंत्रीपदं आली आहेत. विश्वजित कदम वगळता इतर मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळालं होतं. त्यामुळे आता विश्वजित कदम यांनाही कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळतं हे पाहावं लागेल. पालकमंत्र्यांची यादी 1. पुणे- अजित अनंतराव पवार 2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख 3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे 4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे 5. रायगड - आदिती सुनिल तटकरे 6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब 7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत 8. पालघर- दादाजी दगडू भुसे 9. नाशिक-  छगन चंद्रकांत भुजबळ 10. धुळे- अब्दुल नबी सत्तार 11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी 12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील 13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ 14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 15. सांगली- जयंत राजाराम पाटील 16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई 19. जालना-  राजेश अंकुशराव टोपे 20. परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 21. हिंगोली-  वर्षा एकनाथ गायकवाड 22. बीड-  धनंजय पंडितराव मुंडे 23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण 24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 25. लातूर- अमित विलासराव देशमुख 26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू 28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई 29. बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे 30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड 31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 32. वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार 33. भंडारा-  सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख 35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार 36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Embed widget