तुमच्या नावावर किती सिम कार्ड हे अवघ्या 30 सेकंदात कळणार, सरकारच्या नव्या पोर्टलवर मिळणार सिमकार्डची माहिती
तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलं आणि त्याचा गैरवापर केला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते.
मुंबई : तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत?, तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलेलं नाही ना? याचं उत्तर आता तुम्हाला केवळ 30 सेकंदात कळणार आहे. सरकारच्या नव्या पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या सिमकार्डची माहिती तात्काळ मिळणार आहे. tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला मिळू शकेल. तुमच्या नावावर दुसऱ्या कुणी सिमकार्ड घेतलं आणि त्याचा गैरवापर केला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे या पोर्टलचा वापर करून तुमच्या नावावर कुणी सिमकार्ड वापरत नाही ना हे तपासता येणार आहे.
एका आधार कार्डवरून किती सिमकार्ड घेता येतील?
TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, यापूर्वी एका आधारकार्डवर नऊ सिमकार्ड खरेदी करता येत होते. आता एका आधार कार्डवर 18 सिम कार्ड खरेदी करता येतात. बिजनेसमुळे ज्या लोकांना अधिक सिमकार्डची गरज आहे, अशा ग्राहकांना KYC करण्याची गरज आहे. KYC करण्यासाठी 7 डिसेंबरला एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. KYC करण्यासाठी ग्राहकांना 60 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहक, आजारी आणि दिव्यांग नागरिकांना अतिरिक्त 30 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे.
तुमच्या ID वर किती सिम अॅक्टिव्ह आहे याची माहिती का गरजेची आहे?
जर तुमच्या ID वर असे सिम अॅक्टिव्ह चे तुम्ही वापरत नाही तर त्यांचा भुर्दंड तुम्हाला भरावा लागेल. जर तुमच्या ID वरुन रजिस्टर्ड सिम वरुन चुकीचे आणि बेकायदेशीर गोष्टी सुरू असतील तर तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तुमच्या ID वर किती सिम कार्ड रजिस्टर्ड आहे कसे कळेल?
दूरसंचार नियामक विभागानुसार टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) तयार केला आहे. यासाठी tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल देखील लॉन्च केले आहे. या पोर्टलवर देशभरातील सर्व क्रमांकाचा डेटाबेस अपलोड केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून स्पॅम आणि फ्रॉड नंबरवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या ID वरून कोणी सिम वापरत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :