अंतराळातही भारतीय पदार्थांचा डंका, अंतराळावीरांची चमचमित भारतीय अन्नाला पसंती
Astronaut Dr. Anil Menon : भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर डॉ. अनिल मेनन यांनी अंतराळवीरांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अंतराळातही भारतीय चमचमित अन्नपदार्थांचा डंका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Astronaut Dr. Anil Menon : भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर डॉ. अनिल मेनन यांनी अंतराळवीरांबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अंतराळातही भारतीय चमचमित अन्नपदार्थांचा डंका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अंतराळवीर अंतराळात भारतीय चमचमित आणि मसालेदार पदार्थांना पसंती देतात. मेनन हे यूएस एअर फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल आहेत. नासाने मेनन यांची स्पेसएक्सचे (SpaceX) चे पहिले फ्लाईट सर्जन म्हणून निवड केली आहे. मेनन हे 10 नवीन अंतराळवीरांपैकी एक आहेत जे भविष्यात चंद्रावर जाऊ शकतात.
मेनन हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. मिनियापोलिस, मिनेसोटा येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या मेनन यांनी 'डेमो-2' मोहिमेदरम्यान इलॉन मस्क-रन स्पेसएक्सच्या पहिल्या मानवांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेत मदत केली आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये मानवी प्रणालीला फायदेशीर वैद्यकीय संस्था तयार केली. पोलिओ लसीकरणाचा अभ्यास आणि पाठिंबा देण्यासाठी त्यांनी रोटरी अॅम्बेसेडरियल स्कॉलर म्हणून भारतात एक वर्ष घालवले. त्याआधी, त्यांनी अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) घेऊन जाणाऱ्या विविध मोहिमांसाठी NASA चे क्रू फ्लाईट सर्जन म्हणून काम केले आहे. मेनन हे वाळवंट आणि एरोस्पेस मेडिसिनमध्ये फेलोशिप प्रशिक्षणासह सक्रियपणे सराव करणारे आपत्कालीन औषध चिकित्सक आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मेनन यांनी त्यांची भारतीय मुळं आणि भारतीय मसाल्याबद्दलच्या प्रेमाची कबूली दिली. त्यांनी माहिती दिली की, ''बहुतेक अंतराळवीरांची अंतराळात भारतीय खाद्यपदार्थांना पहिली पसंती असते. भारतीय खाद्यपदार्थ त्याच्या मसाल्यांमुळे अधिक पसंतीस उतरतात. गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने अंतराळात द्रव तरंगू लागते. तुमचे नाक कोंदले जाते. त्यामुळे अन्नाची चव वेगळी लागते. अशावेळी भारतीय अन्नपदार्थ अंतराळवीरांच्या आवडीचे असतात. कारण ते अधिक मसालेदार आहे.''
मेनन यांनी सांगितले की, ''त्यांच्या ह्रदयात केरळसाठी विशेष स्थान आहे, कारण त्यांचे वडील मूळचे केरळचे आहेत.'' मेनन अलिकडेच त्यांच्या पत्नीसह केरळमध्ये देवदर्शनासाठी आली होते. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, ''भारतीय लोक खूप स्नेही आहेत. तेथे नेहमीच तुम्हांला स्वागतार्ह वागणूक मिळते. भारतात घालवलेला वेळ माझ्यासाठी अविस्मरणी आणि लाभदायक आहे. येथे शिकलेल्या गोष्टी मला भविष्यातील माझ्या अंतराळाच्या उपक्रमांसाठी उपयोगी ठरतील.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : दिलासादायक! फायझर लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 प्रभावी, संशोधनात उघड
- Mumbai Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी
- कोरोनामुळे श्वसनाचे आजार वाढले; अवैध डास प्रतिबंधक अगरबत्त्या वापरणे थांबवा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha