Omicron Variant : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट 2; असं आहे प्रशासनाचं नियोजन
Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. धारावीत आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.
Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. धारावीत आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. राज्यात शुक्रवारी नव्या 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून यातील तीन रुग्ण मुंबईतील आहेत. चिंतेची बाब म्हणजे गर्दीचं ठिकाण असलेल्या धारावीत आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. टांझानियाहून धारावीतील आलेला व्यक्ती ओमायक्रॉन बाधित असल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा धारावी पॅटर्न राबवला जाणार आहे. याकरता प्रशासनानं नियोजन केले आहे.
काय आहे धारावी पॅटर्न?
फोर टी फॉर्म्युला : ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टींग, ट्रिटींग या फॉर्म्युल्याच्या आधारे होणार काम
प्रशासन नव्यानं कोणतं नियोजन करणार?
धारावीतील नागरिकांचं मोफत मास टेस्टिंग सुरु करण्यात येणार आहे. धारावीतील 80 टक्के लोकसंख्या सार्वजनिक शौचालयं वापरते त्यामुळे दिवसातून 5 ते 6 वेळा सार्वजनिक शौचालयाचं सॅनिटायझेशन करण्यात येईल. धारावीत सुमारे 6 लाख 25 हजारहून अधिक लोकसंख्येची वस्ती आहे. यांपैकी साडेचार लाख लोकसंख्या 18 वर्षांवरील आहे. धारावीत बाहेरुन येणाऱ्या कामगारांची फ्लोटींग पॉप्युलेशनही दिड ते दोन लाखांच्या घरात आहे. धारावीतील 47 टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय. आता हेल्थ पोस्टच्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढवण्यार भर दिला जाणार आहे. त्यासाठी मोबाईल व्हॅन व्हॅक्सिनेशन कार्यक्रमाद्वारे धारावी लसवंत केली जाणार आहे. लसीकरणासाठी धारावीतील लोकांचं प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येईल. लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याकरता असणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील.
कोविड वॉर्ड वॉर रुमकडे दररोज हाय रिस्क, अॅट रिस्क आणि इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची माहिती देण्यात येते. यामध्ये धारावीतील प्रवासी आढळल्यास त्यांना 7 दिवस गृहविलगीकरणात ठेवले जाते. तसेच त्यांची वेळोवेळी चाचणी केली जाते. धारावीतील 350 क्लिनीकची धारावी वॉरियर्सची टीम पुन्हा उभी करुन प्रशासन काम करणार आहे.
दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई पोलिसांनी ओमायक्रनच्या पार्श्वभूमीवर रॅली, मोर्चांना बंदी घातली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राजकीय पक्षांना मुंबईत रॅली काढण्यास परवानगी नाकारण्यात आलीय. अमरावती, मालेगाव, नांदेडमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी BMCकडून मोफत विलगीकरण व्यवस्था; पंचतारांकित हॉटेलचे दर जाहीर
- Omicron Variant : दिलासादायक! फायझर लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 प्रभावी, संशोधनात उघड
- Coronavirus updates : देशात 24 तासांत 7992 कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनची स्थिती काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha