एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संपत्ती किती?
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी नवनिर्वाचित मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची माहिती मागवली. पंधरा दिवसात सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेचा हिशेब देण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील नवनर्वाचित मंत्र्यांना दिले. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा हिशेब मागणाऱ्या योगी आदित्यनाथ यांची संपत्ती किती आहे, याचीही उत्सुकता लोकांना आहे.
बँक बॅलन्स किती?
योगी आदित्यनाथ यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, 72 लाख एवढी एकूण संपत्ती आहे. यामध्ये 30 हजार रुपये रोख रक्कम आहे. दिल्लीत चार, तर गोरखपूरमध्ये दोन बँक खाती आहेत. या बँक खात्यांमध्ये 22 लाख रुपये जमा आहेत. याशिवाय, 1 लाख रुपयांची रिवॉल्व्हर आणि 80 रुपयांची एक रायफलही आहे.
महागड्या वस्तू आणि दागिने किती?
प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 18 हजार रुपयांचा एक स्मार्टफोन खरेदी केला आहे आणि त्यांच्याकडे दोन हजार रुपयांचं घड्याळ आहे. कानात अष्टधातू कुंडल आहेत. त्याचसोबत, सोन्याची चैनीत रुद्राक्षची माळ आहे. दोन्ही मिळून एकूण 45 हजार रुपयांचे दागिने आहेत.
गाड्या किती?
मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ हे सरकारी मर्सिडीज कारमध्ये प्रवास करत आहेत. मात्र, याआधी त्यांच्याकडे फॉर्च्युनर कार होती. 2014 सालचं मॉडेल असलेल्या फॉर्च्युनर कारचा नंबर '0001' आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, योगी आदित्यनाथ यांच्या नावावर आजच्या घडीला एकूण तीन कार आहेत. त्यामध्ये टाटा सफारी, इनोव्हा (12 लाख रुपये) आणि फॉर्च्युनर (21 लाख रुपये) यांचा समावेश आहे.
जमीन किती?
60 एकरावर पसरलेल्या गोरक्षपीठचे महंत असलेल्या आदित्यनाथ यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही किंवा घरही नाही. त्यांना वारसाहक्कानेही घरातून कोणतीच संपत्ती मिळालेली नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही.
आदित्यनाथ यांनी 1994 साली संन्यासाची दीक्षा घेतली आणि चार वर्षानंतर 1998 साली गोरखपूरमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. पहिल्यांदा खासदार झाले, त्यावेळी आदित्यनाथ यांच्याकडे केवळ 72 लाख रुपयांची संपत्ती होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
क्राईम
Advertisement