एक्स्प्लोर
योगी गुजरातमध्ये, मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते रॅली काढणार आहेत.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे अनेक नेते रॅली काढणार आहेत. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेतील. पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे. सूरतमध्ये मोदींची सभा पंतप्रधान मोदी सूरतमध्ये प्रचार सभा घेतील. ही सभा बुधवारी होणार होती, मात्र ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात आली होती. मोदी 8 आणि 9 डिसेंबर रोजी एकूण 8 सभा घेणार आहेत. मोदींच्या सूरतमधील सभेपूर्वी बाईक रॅली काढली जाणार आहे. अमित शाहांच्या तीन रॅली भाजपाध्यक्ष अमित शाह गुजरातमध्ये तीन सभांना संबोधित करतील. सकाळी 11 वाजता महिसागर जिल्ह्यातील कडाना येथे, दुपारी एक वाजता मेहसाणा जिल्ह्यातील खेरालू कॉलेजमध्ये आणि तीन वाजता पाटन जिल्ह्यातील सिद्धपूर येथील सन प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये तिसरी सभा होईल. योगी आदित्यनाथ यांच्या सहा रॅली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दिवसभर प्रचार करणार आहेत. राजकोट, भावनगर, सुरेंद्रनगर, आणंद आणि बडोद्यात ते सभा घेतील. काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, आरपीएन सिंह, आनंद शर्मा आणि रणदीप सुरजेवाला पत्रकार परिषद घेणार आहेत.
- मनमोहन सिंह- राजकोटमध्ये दुपारी 12 वाजता
- आरपीएन सिंह – अहमदाबादमध्ये दुपारी 1 वाजता
- आनंद शर्मा- बडोद्यात दुपारी 12 वाजता
- रणदीप सुरजेवाला- दुपारी 4 वाजता
संबंधित बातमी : गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी
आणखी वाचा























