एक्स्प्लोर

गर्भवती हत्तीण हत्या प्रकरण : एका आरोपीला अटक; केरळ वन विभागाची कारवाई

काही दिवसांपूर्वी फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्यामुळे केरळमध्ये हत्तीणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. केरळ वन-विभागाने या कारवाईविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली.

तिरुअनंतपुरम : केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच हत्तीणीला फटाकांनी भरलेलं फळं खायला दिलेल्या आरोपींविरोधातही संताप व्यक्त केला जात होता. अशातच या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती शेतात काम करते. केरळ वन-विभागाने या कारवाईविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली.

केरळमधील मलप्पुरमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. एका भुकेल्या गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने मृत्यू झाला होता. या फटाक्यांच्या स्फोटानंतर या हत्तीणीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे हत्तीणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली होती. या अमानवीय घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.

एका वन अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टनंतर हा सगळा प्रकार उजेडात आला. या वन अधिकाऱ्यांच्या फेसबूक पोस्टनंतर सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्या अटकेची मागणी आता केली जात होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेरीस केरळ सरकारने पावलं उचलत पोलीस आणि वन-विभागातर्फे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास ऑपरेशन आखलं. सरकारी यंत्रणांच्या या प्रयत्नांना अखेरीस यश येताना दिसत आहे. केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली.

पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

गर्भवती हत्तीणीच्या प्राथमिक पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, तोंडात स्फोट झाल्यामुळे हत्तीणीच्या तोंडात जखमा झाल्या होत्या. हत्तीण गेल्या अनेक दिवसांपासून उपाशी असून 10 ते 12 दिवसांपासून तिला वेदनाही होत होत्या. त्यामुळे ती काहीही खात नव्हती की, पाणीही पित नव्हती. त्यामुळे काही दिवसांनी ती अशक्त झाली आणि पाण्यात पडली. रिपोर्ट्सनुसार, अशक्त झाल्यामुळे हत्तीण पाण्यात पडली आणि त्यामुळे तिच्या शरीरात पाणी गेलं आणि फुफ्फुसांनी काम करणं बंद केलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

आरोपींना शिक्षा देण्यची अभिनेत्री अनुष्का शर्माची मागणी

अनुष्का शर्माने टेड द स्टोनर या पेजवरचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं की, आम्ही सर्व केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या घटनेला जबाबदार गुन्हेगारांना शोधून या क्रुरकृत्याबद्दल त्यांना कडक शिक्षा द्या.

काय आहे घटना?

केरळमधील मलप्पुपरम येथील वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी एक पोस्ट आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी लिहिला होता. मोहन कृष्णन यांच्या पोस्टनुसार, एक भुकेली गर्भवती हत्तीण अन्नाच्या शोधात जंगलाजवळील एका गावात गेली होती. अन्नासाठी इथेतिथे ती फिरत होती. त्यानंतर काही अज्ञात लोकांनी फटाक्यांनी भरलेली अननस तिला खायला दिलं.

मोहन कृष्णन पुढे लिहितात, या फटाक्यांच्या स्फोटामुळे ही हत्तीण जखमी झाली. फटक्यांच्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की हत्तीणीच्या तोंड आणि जीभेला गंभीर इजा झाली. भूक लागली म्हणून जंगल सोडून मानवी वस्तीत आलेल्या हत्तीणीला माणसांनी पुन्हा अन्न खाण्याजोगंही नाही ठेवलं. एवढी गंभीर जखमी झालेली असतानाही या हत्तीणीने कुणालाही इजा पोहोचवली नाही. कुणावरही हल्ला न करता ती परतली.

गर्भवती असल्याने अन्नाच्या शोधात हत्तीण वेल्लियार नदीपर्यंत पोहोचली. त्यानंतर पाण्यात जाऊन उभी राहिली. तोंडावरील जखमेवर पाणी मारल्यानंतर हत्तीणीला थोडं बरं वाटलं. हत्तीणीच्या स्थितीची माहिती मिळताच वन अधिकारी दोन हत्तींना घेऊन नदीवर पोहोचले. दोन हत्तींच्या मदतीने या हत्तीणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. काही तासांच्या प्रयत्नानंतर हत्तीणीला पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हत्तीणीचा काही वेळातच मृत्यू झाला, असं मोहन कृष्णन यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या : 

फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने हत्तीणीचा मृत्यू; गुन्हेगारांना शोधण्याची अनुष्का शर्माची केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget