एक्स्प्लोर
Advertisement
एमिरेट्स एअरलाईन्समध्ये 'हिंदू मील' बंद होणार
एअरलाईन्स हिंदू प्रवाशांना दोन प्रकारच्या जेवणाचे पर्याय उपलब्ध करुन देतात. पहिला पर्याय म्हणजे एशियन व्हेज. यामध्ये जेवण पूर्णपणे शाकाहारी असतं. तर दुसरा हिंदू मीलचा पर्याय असतो.
नवी दिल्ली : दुबईची नावाजलेली विमान कंपनी एमिरेट्स एअरलाईन्सने विमानप्रवासात हिंदू मील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान प्रवासादरम्यान धार्मिक आस्थेनुसार आपलं जेवण ठरवण्याचा पर्याय विमान कंपन्या प्रवाशांना देत असतात. मात्र एमिरेट्स एअरलाईन्सनं ही सेवा बंद केली आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या अभिप्रायानंतर हा निर्णय घेतल्याचे एमिरेट्स एअरलाईन्सने स्पष्ट केलं आहे.
एमिरेट्स् एअरलाईन्सने याबाबत आपल्या वेबसाईटबर अधिक माहिती दिली आहे. 'आम्ही इकोनॉमिक्स क्लासमध्ये हिंदू मीलचा पर्याय बंद करत आहोत. विमानात कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेबाबत आम्ही प्रवाशांकडून अभिप्राय मागवत असतो. प्रवाशांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारावरच आम्ही हा निर्णय घेतला आहे. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासमध्ये ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे कंनीने स्पष्ट केलं आहे.
हिंदू मीलचा पर्याय बंद केला असला तरी, प्रवासी अॅडव्हान्समध्ये आऊटलेटमधून जेवण मागवू शकतात, असंही एमिरेट्स कंपनीने सांगितलं आहे. आऊटलेट्स विमानातही सुविधा पुरवतात. जैन जेवण, भारतीय शाकाहारी जेवण, बिफ नसलेलं विशेष जेवण यांसारखे अनेक पर्याय आऊटलेटमध्ये उपलब्ध आहेत.
एअरलाईन्स हिंदू प्रवाशांना दोन प्रकारच्या जेवणाचे पर्याय उपलब्ध करुन देतात. पहिला पर्याय म्हणजे एशियन व्हेज. यामध्ये जेवण पूर्णपणे शाकाहारी असतं. तर दुसरा हिंदू मीलचा पर्याय असतो. हिंदू मीलमध्ये हिंदू प्रवाशांसाठी मटण, मच्छी, अंड आणि डेअरी प्रोडक्ट्स यासारखे पर्याय असतात. मात्र या पदार्थांमध्ये बीफ नसतं.
विमान कपंन्या आपल्या प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाना पर्याय देतात. एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्समध्ये धार्मिक जेवणाचा पर्याय असतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्रीडा
पुणे
Advertisement