DRDO ची कमाल, केवळ 45 दिवसांत सात मजली बिल्डिंग उभारण्याची किमया
सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनने (DRDO) केवळ 45 दिवसांमध्ये सात मजली बिल्डिंग उभी केली आहे.
बंगळुरु: डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनने (DRDO) केवळ 45 दिवसांत सात मजली बिल्डिंग उभी करण्याची किमया साधली आहे. या बिल्डिंगचे उद्घाटन आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात झालं आहे. पाचव्या पीढीतील अॅडव्हान्स मीडिअम कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेन्ट (AMCA) फॅसिलिटीच्या स्वरुपात या बिल्डिंगचा वापर करण्यात येणार आहे. ही बिल्डिंग बंगळुरुमध्ये उभारण्यात आली आहे.
Raksha Mantri Shri @rajnathsingh today inaugurated #FlightControlSystem Integration facility at #AeronauticalDevelopmentEstablishment in Bengaluru in the presence of Chief Minister of Karnataka Shri @BSBommai and Chairman @DRDO_India Dr G Satheesh Reddy.https://t.co/ZsNK2GQC4V pic.twitter.com/Voyr7uJ5Ja
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) March 17, 2022
या बिल्डिंगचा वापर हा फायटर एअरक्राफ्ट फ्लाईंग कंट्रोलच्या एव्हियोनिक्सच्या विकासाच्या स्वरुपात केला जाणार आहे. या प्रकल्पाला बंगळुरुतील एअरोनॉटिकल एस्टॅब्लिशमेंटकडून अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. आज या बिल्डिंगचे उद्घाटन झाल्यानंतर संरक्षण मंत्र्यांना या प्रकल्पाचं प्रेजेन्टेशन देण्यात आलं.
@rajnathsingh @adgpi @PIB_India @indiannavy @IAF_MCC @drajaykumar_ias @AjaybhattBJP4UK @PIBHindi @DRDO_India @IndiaCoastGuard @DefProdnIndia @sjaju1 pic.twitter.com/2c7F99VnRa
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) March 17, 2022
डीआरडीओने या बिल्डिंगची उभारणी केवळ 45 दिवसांत केली असून संरक्षणमंत्र्यांनी याचे कौतुक केलं आहे. अशा पद्धतीची किमया देशामध्ये पहिल्यांदाच करण्यात आली आहे. या बिल्डिंगच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि डीआरडीओचे अध्यक्ष सतिश रेड्डी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या:
- Defence Ministry Update: भारताच्या मिसाईलचा निशाणा थेट पाकिस्तानमध्ये; मिसाईल चुकून डागल्याचं सांगत भारताकडून खेद व्यक्त
- Indias Missile Firing: भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये कसे पडले, राज्यसभेत राजनाथ सिंह यांनी सांगितले की...
- Yashwantrao Chavan : हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! दगाबाज चीनच्या बंदोबस्तासाठी यशवंतराव जेव्हा दिल्लीत पोहोचले