एक्स्प्लोर

Delhi News: स्वातंत्र्य दिनापूर्वी राजधानी आत्मघाती हल्ल्याचा इशारा; दिल्ली, पंजाब अलर्ट मोडवर

Delhi News: भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर असून दिल्ली आणि पंजाबमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. दहशतवाद्यांमधील संभाषणाचा हवाला देत गुप्तचर विभागानं अलर्ट जारी केला आहे.

Delhi News: नवी दिल्ली : जम्मूमध्ये (Jammu) कार्यरत असलेल्या दहशतवादी (Terrorist Attack) गटातील एक किंवा दोन सदस्य स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) आसपास दिल्ली आणि पंजाबमध्ये (Punjab) आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर असून दिल्ली आणि पंजाबमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. 

दहशतवाद्यांमधील संभाषणाचा हवाला देत गुप्तचर विभागानं सूचित केलं आहे. गुप्तचर यंत्रणांनी सांगितलंय की, सुरक्षा दलांच्या मोठ्या प्रमाणावर तैनातीमुळे हा हल्ला 15 ऑगस्टला झाला नसला, तरी एक-दोन दिवसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

गुप्तचर यंत्रणांनी दिलीय आत्मघातकी हल्याची माहिती 

गुप्तचर माहितीचा हवाला देऊन एका सूत्रानं सांगितलं की, "जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही."

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "1 जून रोजी स्फोटकं/आयईडीची खेप जम्मू शहराच्या अंतरावर पोहोचली. या स्फोटकांचा वापर आगामी काळात सुरक्षा आस्थापना, कॅम्प, वाहनं किंवा महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो." 

गुप्तचर सूत्रांनी उघड केलं आहे की, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या लगतच्या भागांत कार्यरत असलेल्या गुंड, कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांचा आयएसआय प्रायोजित संबंध स्वातंत्र्यदिन आणि सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत होता. गुप्तचर विभागाच्या सतर्कतेनुसार, "15 ऑगस्टच्या आसपास मोठ्या संख्येनं लोकांना लक्ष्य करण्यासाठी तयार केलेल्या IEDs चा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच सरकारच्या काही निर्णयांवर किंवा कृतींबाबत असंतुष्ट घटकांकडून सूडबुद्धीची कारवाई होण्याची शक्यता असल्यानं धोका आणखी वाढला आहे." 

दिल्लीत हायअलर्ट 

दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली . बांगलादेशातील परिस्थिती बघता दिल्ली NCR मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांगलादेशात सध्या गृहयुद्ध भडकलं आहे. अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती बघता दिल्ली एनसीआरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

iPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगाKhed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हानसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार? 16 हजार मेगावॅट सौरऊर्जेचं उद्दीष्ट,  50 हजार एकर जमीनीचं संपादन
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान
Bhaskarrao Khatgaonkar : अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये परतणार
Rupali Chakankar: 'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
'सोळा सोमवार ,गुरुवार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', रुपाली चाकणकरांनी महिलांना संविधान वाचण्याचा दिला सल्ला
Embed widget