Delhi Fire : दिल्लीतील AIIMS रुग्णालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी
Delhi AIIMS Hospital Fire : दिल्लीतील AIIMS रुग्णालयाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
Delhi AIIMS Hospital Fire : दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयाला भीषण आग (AIIMS Fire) लागल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या (Delhi Fire Brigade) आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पीटीआयने ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. पीटीआयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली आहे.' मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्ली अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग
दिल्ली एम्सच्या आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुमारे 11.54 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
VIDEO | Fire breaks out in a building of AIIMS, Delhi. More details are awaited. pic.twitter.com/sYWspfzZEN
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2023
सर्व रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं
अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. सर्व रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आग तीव्र असून धुराचे लोट वर उठताना दिसत आहेत. ताज्या अपडेटनुसार, आपत्कालीन वॉर्डच्या वरची आग आटोक्यात आली आहे. रुग्णांना वॉर्डातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
एम्सच्या एंडोस्कोपी रूममध्ये लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या एंडोस्कोपी रूममध्ये आग लागली. तेथूनही लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. अग्निशमन विभागाला आज सकाळी 11.54 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.
दररोज सुमारे 12 हजार रुग्ण उपचार घेतात
दिल्लीतील एम्स रुग्णालयात देशभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. यासोबतच येथे विदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दररोज सुमारे 12 हजार रुग्ण उपचार घेतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :