एक्स्प्लोर
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली
नवी दिल्ली : उनावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दलित स्वाभिमान संघर्ष रॅली काढण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे.
संसद मार्गावरील मोर्चात नरेंद्र मोदी मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, गो रक्षक मुर्दाबादच्या घोषणा सुरु आहेत. तथाकथित गो रक्षकांच्या गुंडगिरीला तात्काळ आळा घालण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
दलितांवरील संघटित अत्याचाराविरोधात ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. दलितांवरील अत्याचाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहे. याशिवाय राज्याराज्यांमध्ये आंदोलन करणार असून 2018 मध्ये आणखी मोठं आंदोलन उभं करुन, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार संघाचा: आंबेडकर
तसंच ज्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यांना न्याय द्या, अशी आमची मागणी असल्याचंही आंबेडकरांनी नमूद केलं. मराठा मोर्चाचं स्वागत, दलितांचे प्रतिमोर्चे नकोत यापूर्वी 'मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढणे दलितांच्या हितासाठी नव्हे, असे मोर्चे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक होतील. मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरु आहे,' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी संघावर निशाणा साधला होता. कोपर्डी बलात्काराच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं होता. या मोर्चात लवकरच सीताराम येचुरी, डी राजा आणि सुधाकर रेड्डी मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement