एक्स्प्लोर

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात मोठी वाढ

Cabinet Decisions : या निर्णयाचा 47 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्यावर (Dearness Allowance-DA) मंत्रीमंडळात गुरुवारी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारने दिवाळी भेट दिली आहे. महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. तर  DRमधील वाढीलाही ग्रीन सिग्नल दिलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा 47 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. एक जुलैपासून हा महागाई भत्ता लागू होणार आहे. 

देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मे 2020 पासून 30 जून 2021 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 1 जुलै 2021 नंतर तो पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. 

एक जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. 11 टक्के असणारा महगाई भत्ता 17 टक्केंनी वाढून आता 28 टक्के इतका करण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळं वस्तूंच्या किमती देखील वाढत जातात. त्यामुळं लोकांजवळ असलेल्या पैशांची क्रय क्षमता कमी होत जाते. यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मदत होते. 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर पेन्शनधारक लोकांना लाभ होणार आहे. देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील वाढता ताण पाहता महागाई भत्ते वाढवण्यावर निर्बंध आणले होते. मागील वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दोन हफ्त्यात देण्यावर बंदी आणली होती. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
नेहा बोराला दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका! दंडाधिकाऱ्यांच्या नोटीसला आव्हान देणारी याचिका फेटाळली
नेहा बोराला दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका! दंडाधिकाऱ्यांच्या नोटीसला आव्हान देणारी याचिका फेटाळली
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
ED Actions: मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget