Cyclone Tauktae | तोक्ते चक्रवादळ गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं
ताशी 185 किलोमीटर वेगाने तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं. तोक्ते चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुमारे दोन तास चालली, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे.
अहमदाबाद : तोक्ते चक्रवादळ सोमवारी (17 मे) रात्री गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग ताशी 185 किलोमीटर होता. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुमारे दोन तास चालली. चक्रीवादळामुळे गुजरातच्या अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या. वादळ धकल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसही बरसत आहे.
THE EXTREMELY SEVERE CYCLONIC STORM ‘TAUKTAE’ LAY
— India Meteorological Department (@Indiametdept) May 17, 2021
CENTRED AT 2130 HRS IST OF TODAY, THE 17TH MAY 2021
OVER NORTHEAST ARABIAN SEA, NEAR LAT. 20.65°N AND
LONG. 71.15°E, ABOUT 25 KM EAST OF DIU.
LANDFALL PROCESS IS CONTINUING
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळ हलवण्यात आलं. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 54 पथकं मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. तर पोरबंदरमधील सदर रुग्णालयाच्या आयसीयूमधून जवळपास ऑक्सिजनवर असलेल्या 17 कोरोनाबाधित रुग्णांना खबरदारी म्हणून इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं होतं.
मागील 23 वर्षांत गुजरातमधील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तोक्ते चक्रीवादळ हे गुजरातमध्ये मागील 23 वर्षात धडक देणारं सर्वात शक्तिशाली वादळ आहे. चक्रीवादळामुळे दोन मोठ्या जहाजांमध्ये 410 जण अडकले असून त्यांना नौदलाच्या तीन जहाजांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
महाराष्ट्राला तडाखा
दरम्यान गुजरातला पोहोचण्याआधी तोक्ते वादळाने महाराष्ट्रात मोठं नुकसान केलं. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या चक्रीवादळामुळे सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. याशिवार चार जनावरंही दगावली आहेत. मुंबईसह अनेक भागात अजूनही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.
संबंधित बातम्या
- तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदतकार्य वेगाने सुरु ठेवण्याचे आदेश
- Cyclone tauktae | मुंबईप्रमाणे ठाणे शहरालाही तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका
- Cyclone Tauktae Update : चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 कोटींहून अधिक नुकसान, सर्वात मोठा फटका महावितरणला
- Cyclone Tauktae | तोक्ते चक्रीवादळाचे रायगड जिल्ह्यात थैमान, डोळ्यादेखत अनेकांचे संसार उध्वस्त, मन हेलावून टाकणारे फोटो























