एक्स्प्लोर

Cyclone Tauktae Update : चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 कोटींहून अधिक नुकसान, सर्वात मोठा फटका महावितरणला

तोत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका महावितरणला बसला आहे.

सिंधुदुर्ग : तोत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लाख 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर 53 ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. तर 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पुर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे. 

एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे 16 लक्ष 94 हजार 100 रुपये, 19 शाळांचे 8 लक्ष 75 हजार 707 रुपयांचे, 11 शासकीय इमारतींचे 1 लक्ष 70 हजार रुपयांचे, 13 शेडचे 1 लक्ष 10 हजार रुपयांचे 4 सभागृहांचे 6 लक्ष 16 हजार रुपयांचे आणि इतर 6 लक्ष 38 हजार 300 असे नुकसान झाले आहे. 
 
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची तालुका निहाय माहिती पुढील प्रमाणे असून सर्व नुकसानीची माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे.

दोडामार्ग - 44 घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये 43 घरांचे अंशतः व  एका घराचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 2 शांळांचेही नुकसान झाले असून 43 ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत. 43 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

सावंतवाडी - 116 घरांचे अंशतः तर 4 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 13 गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 350 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून 100 विद्युत पोलही पडले आहेत. एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे. 

वेंगुर्ला - 87 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद असून 6 गोठ्यांचे, एका शाळेचे, 3 शासकीय इमारतींचे, 45 विद्युत पोल आणि 2 विद्युत वाहिन्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 

कुडाळ - 302 घरांचे, 22 गोठ्यांचे, 7 शाळांचे, 2 शेडचे व 2 सभागृहांचे अंशतः नुकसान झाले असून 120 विद्युत पोलचे अंशतः नुकसान झाले आहे. 

मालवण - 972 घरांचे अंशतः तर 7 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 25 गोठ्यांचे, 2 शाळांचे, 8 शासकीय इमारती, 157 विद्युत पोल, 10 शेडचे व एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे. 412 ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 

कणकवली - 133 घरांचे, 29 गोठ्यांचे, एका शाळेचे, 66 विद्युत पोल, 16 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 

देवगड - 145 घरांचे, 36 गोठ्यांचे, 4 शाळांचे, 132 विद्युत पोल, 95 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 

वैभववाडी - 262 घरांचे, 8 गोठ्यांचे, एका शाळेचे, 120 विद्युत पोल, 35 विद्युत वाहिन्या आणि एका शेडचे अंशतः नुकसान झाले आहे. 

तोत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget