एक्स्प्लोर
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 175, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंद
देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 175 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, तीन जणांचा यात मृत्यू झालाय. आजच्या एकाच दिवसात 20 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 175 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात 20 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असून त्यांचा आकडा 47 आहे. तर, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे विदेशातून यात्रा करुन आलेले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन कामाची परवानगी दिलीय. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार आहे.
चीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेला कोरोना व्हायरस आतापर्यंत जवळपास 175 देशांमध्ये पोहचला आहे. दोन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून सहा हजाराच्यावर लोकांचा यात मृत्यू झालाय. भारतातही या व्हायरसने आता हातपाय पसरायला सुरुवात केलीय. देशात 166 जणांना कोरोनाची बाधा झाली असून तीन जणांचा यात मृत्यू झालाय. विशेष म्हणजे एका दिवसात 20 जणांना याची लागण झाल्याची नोंद करण्यात आलीय. यात सर्वाधिक 47 महाराष्ट्रात असून त्याखालोखाल केरळचा नंबर आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तर, अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 47 वर, मुंबईत आणखी दोन महिलांना लागण
देशातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी - 175
आंध्रप्रदेश - 2
दिल्ली – 11+1 विदेशी 1 मृत
हरियाणा – 4+14 विदेशी
कर्नाटक – 14, 1 मृत
केरळ – 25 + 2 विदेशी
महाराष्ट्र – 43 + 3 विदेशी, 1 मृत
ओडिशा - 1
पंजाब - 2
राजस्थान – 5 + 2 विदेशी
तामिळनाडू - 2
तेलंगाणा – 10 + 2 विदेशी
जम्मू आणि काश्मिर - 4
लडाख – 8
उत्तरप्रदेश - 16 +1 विदेशी
उत्तराखंड – 1
पश्चिम बंगाल – 1
छत्तीसगढ़ - 1
पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात 151 कोरोनाग्रस्त आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus | जगभरात कोरोनाचं थैमान, 8945 मृत्युमुखी; इटलीत 24 तासात 475 जणांचा बळी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement