एक्स्प्लोर

Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 47 वर, मुंबईत आणखी दोन महिलांना लागण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. युकेवरुन आलेली 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तर, उल्हासनगर येथील 49 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. ती नुकतीच दुबईहून परतली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगर इथे कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले आहेत. एकट्या पुण्यात कोरोनाचे 19 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे. युनायटेड किंग्डमवरुन आलेली 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तर, उल्हासनगर इथल्या 49 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला नुकतीच दुबईहून परतली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती पुणे - 8 पिंपरी चिंचवड - 11 मुंबई - 10 नागपूर - 4 यवतमाळ - 3 कल्याण - 3 नवी मुंबई - 3 रायगड - 1 ठाणे - 1 अहमदनगर - 1 औरंगाबाद - 1 रत्नागिरी- 1 भारतात कोरोनाबाधितांची संख्या 166 झाली आहे. तर कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात आठ नव्या लॅब सुरु करणार : राजेश टोपे राज्यात कोरोना व्हायरस संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या 15 दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी (18 मार्च) दिली. तसेच आजपासून तीन ठिकाणी कोरोना व्हायरसची तपासणी सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. मुंबई अंशत: लॉक डाऊन कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळाल्यावरच ते शक्य होईल. यासाठी बुधवारी (18 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इटलीमध्ये एका दिवसात 475 जणांचा मृत्यू कोरोना व्हायरसचा कहर जगभरात वाढत जात आहे. सध्या याचा सर्वाधित परिणाम इटलीमध्ये दिसून येत आहे. इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजार नऊशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढचं नाहीतर इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 4,207 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे इटलीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 35 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. Coronavirus | कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई आजपासून अंशत: लॉकडाऊन, 50 टक्के दुकानं बंद

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन
Thane News : वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
वाढदिवसाचा थीम केक बेतला जीवावर! 3 वर्षीय चिमुकल्याच्या पोटात गेल्या धातूच्या तारा, अन् पुढे तब्बल 48 तासानंतर....; ठाण्यातील खळबळजनक घटना
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Devendra Fadnavis : नेहरू अन् मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रिया म्हणाले, 'कुठलीही स्पर्धा नाही. खरं म्हणजे केवळ...'
नेहरू अन् मोदींची तुलना करू नका; शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रिया म्हणाले, 'कुठलीही स्पर्धा नाही. खरं म्हणजे केवळ...'

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Embed widget