एक्स्प्लोर

Coronavirus Update | कोरोना व्हायरसची देशभरातील सद्यस्थिती, कोरोनाचं केंद्र असलेल्या वुहान प्रांतात स्थिती नियंत्रणात

भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 147 वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभर अक्षरश: थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास 8 हजार लोकांचा या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 147 वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या ज्या वुहान शहरातून या कोरोनाची व्हायरसरची सुरुवात झाली होती, तेथील परिस्थिती आता जवळपास नियंत्रणात आली आहे. आज जगभरात कोरोनाविषयी काय घडमोडी घडल्या यावर नजर टाकूया.

देशात 147 जणांना कोरोनाची लागण देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज देशभरात कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 147 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये 122 भारतीय आहेत, 25 परदेशी नागरिक आहेत तर 14 लोकांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे.

राज्यात रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती

  • पुणे - 8
  • पिंपरी-चिंचवड - 10
  • मुंबई - 7
  • नागपूर - 4
  • यवतमाळ - 3
  • कल्याण - 3
  • नवी मुंबई - 3
  • रायगड - 1
  • ठाणे - 1
  • अहमदनगर - 1
  • औरंगाबाद - 1

देशातील 16 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण

  • महाराष्ट्र- 42
  • केरळ- 25
  • उत्तर प्रदेश- 16
  • हरियाणा- 16
  • कर्नाटक- 11
  • दिल्ली- 10
  • लडाख- 8
  • तेलंगणा- 5
  • राजस्थान- 4
  • जम्मू काश्मीर- 3
  • ओदिशा- 1
  • पंजाब- 1
  • तामिळनाडू- 1
  • उत्तराखंड- 1
  • आंध्र प्रदेश- 1
  • पश्चिम बंगाल- 1

देशात आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत काल 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही व्यक्ती कामानिमित्त दुबईला गेली होती. त्याआधी 13 मार्चला कर्नाटकातील कलबुर्गी येथे 16 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती सौदी अरेबियाहून आली होती. तर दिल्लीतील एका 68 वर्षीय महिलेचाही 17 मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची नजर कोरोना व्हायरसविषयी अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना शोधून काढण्यासाठी मुंबई पोलिसांची सायबर सेलची टीम कार्यरत आहे.

क्वालालंपूरमध्ये 300 भारतीय अडकले कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये जवळपास 300 भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थांचा समावेश आहे. हे सर्व भारतीय फिलिपीन, कंबोडिया, मलेशिया येथून आले आहेत. सध्या हे सर्व भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.

अमेरिकेत कोरोनामुळे 105 नागरिकांचा मृत्यू अमेरिकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. .कोरोनामुळे आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. ऑस्ट्रेलियातही कोरोनाची 450 लोकांना लागण झाली आहे.

चीनच्या वुहानमध्ये परिस्थिती नियंत्रणात चीनच्या वुहान शहरात या कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. या वुहान शहरात गेल्या दोन दिवसात केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 3237 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी चीनमध्ये एकूण 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. वुहान आणि हुबेई प्रांत गेल्या 23 जानेवारीपासून बंद आहेत.

संबंधित बातम्या : Coronavirus | एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका, एकाच दिवशी दीड कोटींचं नुकसान Coronavirus | तुमच्या घरी येणाऱ्या न्यूजपेपरवर कोरोना व्हायरस तर नाही? Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर, हायकोर्टाकडून 15 हजारांचा दंड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget