एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मेड इन इंडिया : भारतीय रेल्वेनं सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड; रुग्णालयातील सर्व सुविधा मिळणार

कोरोना संक्रमित आणि संशयितांची वाढती संख्या पाहता देशात रुग्णालये कमी पडण्याची शक्यता आहे. यावर भारतीय रेल्वेने उपाय शोधला असून रेल्वे डब्याचं रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केलं आहे.

कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे. सोबतचं कोरोना संशयितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी सरकारी आणि खासगी रुग्णालये कमी पडत आहे. शिवाय कोरोना संशयित रुग्णांना घरातचं कॉरंटाईन करणे धोक्याचं आहे. यावर भारतीय रेल्वेने उपाय शोधला आहे. बंद पडलेल्या रेल्वेच्या डब्याचे रुपांतर त्यांनी रुग्णालयात केलं आहे. डब्यात आयसोलेश वार्डची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णालयांची कमतरता भासल्यास रेल्वेचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या डब्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरीत केलं आहे. पश्चिम रेल्वेकडून वर्कशॉपमध्ये 28 डब्यांत प्रायोगिक स्वरुपातील आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. गरज पडल्यास असे 3 लाख आयसोलेशन बेड होऊ शकतात. रेल्वेच्या 28 नॉन एसी कोचचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केलं आहे. वर्कशॉपमध्ये पाच आणि एएमव्हीमध्ये 5 कोच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. दोन्ही वर्कशॉप्स प्रोटोटाइप कोच फायनल स्टेजमध्ये आहेत. 28 कोच 6 एप्रिलपर्यंत तयार करण्यात येतील.

coronavirus | राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 181 वर, दिवसभरात मुंबईत 26 नव्या रूग्णांची नोंद

कसं आहे आयसोलेशन वॉर्ड? प्रत्येक कोचमध्ये शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. तसंच प्रत्येक कोचच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचं रुपांतर बाथरूममध्ये कऱण्यात आलं आहे. टॉयलेटमध्ये बादली, मग आणि सोप डिश ठेवली आहे. तसंच मधले बर्थही काढण्यात आले आहेत. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कोचमध्ये अप्पर बर्थवर चढण्यासाठी असलेल्या शिड्या काढल्या आहेत. तसंच प्रत्येक केबिनमध्ये मेडिकल इक्विपमेंटसाठी बॉटल होल्डर लावण्यात आले आहेत. डब्यांमध्ये चार्जिंग स्लॉटही दुरुस्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्येक केबिनमध्ये प्लास्टिकचे पडदे लावण्यात आले आहे.

लढा! कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून 500 कोटींची मदत जाहीर

देशात कोरोना संक्रमितांची संख्या हजारच्या जवळ देशात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढत आहे. आत्ताच्या घडीला 953 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात सर्वाधिक 176 रुग्ण हे केरळमध्ये असून त्या खालोखाल महाराष्ट्रात 167 रुग्ण आहेत. केंद्र सरकारने कोरोना संकटांशी लढण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. तर, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. अन्नसुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला थेट पैसे देण्याची योजना केंद्र सरकारने घोषित केली.

Accident News | कोरोनाच्या भीतीने गावी परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात; सहा वर्षाच्या मुलासह पती-पत्नीचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलीSanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Embed widget