Coronavirus: देशात 24 तासात 83 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारांवर
देशातील रुग्णांचा आकडा आता 39 हजार 980 वर गेला आहे. आत्तापर्यंत 10 हजार 663 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारावर गेली आहे. देशातील रुग्णांचा आकडा आता 39 हजार 980 वर गेला आहे. आत्तापर्यंत 10 हजार 663 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत देशात 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 521, गुजरातमध्ये 262, मध्य प्रदेशात 151, राजस्थानात 65, दिल्लीत 64, उत्तर प्रदेशात 43, आंध्र प्रदेशात, 33, पश्चिम बंगालमध्ये 33 तमिळनाडूमध्ये 29, तेलंगाणा 28, कर्नाटकात 25, पंजाबमध्ये 20, जम्मू-काश्मिर 8, हरियाणा 4, झारखंड 3, बिहार 4, आसाम 4, हिमाचल, प्रदेश, मेघालय आणि ओडिसामध्ये प्रत्येकी एक जणांचा मृत्यू झाली आहे.
जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 44 हजारांवर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 34 लाख 80 हजार 492 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 11 लाख 8 हजार रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासात 82,398 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 5,162 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना लॉकडाऊनमध्ये झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. त्यानुसार रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या :
Lockdown 3 | राज्यात लॉकडाऊनमध्ये झोननिहाय शिथिलता; काय सुरु होणार? काय बंद राहणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
