एक्स्प्लोर

Govinda On Indusrty: 'ज्यांचं नाव चांगलंय, ते खूपच डेंजर असतात...'; गोविंदाकडून बॉलिवूडच्या 'त्या' मोठ्या नावाची पोलखोल

Govinda On Indusrty: कधी हेल्थ, कधी रिलेशनशिप तर कधी पत्नी सुनिता अहुजानं लावलेल्या गंभीर आरोपांमुळे गोविंदा चर्चेत आला. पण, यावेळी अभिनेत्यानं आपल्या एका मुलाखतीत बोलताना ग्लॅमरस दिसणाऱ्या इंडस्ट्रीची काळी बाजू सर्वांना सांगितली आहे. 

Govinda On Indusrty: बॉलिवूडचा (Bollywood) असा सुपरस्टार ज्याच्या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहायचे. त्याच्या सिनेमाची तिकीटं अगदी ब्लॅकनंही विकली जायची, ते नाव म्हणजे, सुपरस्टार गोविंदा (Govinda). एककाळ असा होता, त्यावेळी प्रेक्षक सुपरस्टार गोविंदाच्या सिनेमांची आतुरतेनं वाट पाहायची. त्याकाळात त्यांची एवढी क्रेझ होती की, चाहत्यांनी त्यांना 'हीरो नंबर 1'चा टॅग दिलेला. पण, म्हणतात ना की, वेळ नेहमीच सारखी नसते आणि तेच गोविंदासोबत झालं. कधीकाळी बॉलिवूडमध्ये एकाच वेळी खूप साऱ्या फिल्म करणारा गोविंदा आज इंडस्ट्रीपासून दूर गेलाय. दरम्यान, सध्या तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाहीतर त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. कधी हेल्थ, कधी रिलेशनशिप (Govinda Relationship) तर कधी पत्नी सुनिता अहुजानं  (Sunita Ahuja) लावलेल्या गंभीर आरोपांमुळे गोविंदा चर्चेत आला. पण, यावेळी अभिनेत्यानं आपल्या एका मुलाखतीत बोलताना ग्लॅमरस दिसणाऱ्या इंडस्ट्रीची काळी बाजू सर्वांना सांगितली आहे. 

एकत्र फिल्म साइन करण्याचं सांगितलेलं कारण

गोविंदा (Govinda)नं नुकतीच सिद्धार्थ कान्ननला मुलाखत दिली. यावेळी त्यानं कित्येक प्रश्नांची बेधडकपणे उत्तरं दिली. यावेळी बोलताना गोविंदानं इंडस्ट्रीत यशाचा एवढा मोठा टप्पा गाठण्याबाबत त्याला काय वाटतं, हेसुद्धा सांगितलं. मुलाखतीदरम्यान सिद्धार्थनं त्याला विचारलं की, त्यानं एकाच वेळी इतके सिनेमे साइन का केले होते?  त्याला इतरांचं भलं करायचं होतं? यावर गोविंदानं स्पष्टपणे आणि प्रामाणिक उत्तर दिलं, तो म्हणाला की, "मला स्वतःचं भलं करायचं होतं, इतरांचं नाही..." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदानं कुणाला म्हटलं सर्वात डेंजर व्यक्ती?

यावर बोलताना सिद्धार्थनं पुढे विचारलं की, "त्यातले काही सिनेमे केले नाही, त्यामुळे नाव तर खराब झालं ना..." यावर गोविंदा म्हणाला की, "फिल्म लाइनमध्ये कुणाचं नाव चांगलंय? कुणाचं नाव चांगलंय इथे... ज्याचं नाव चांगलंय, तो खूप मोठा डेंजर माणूस आहे... हा... इथे ज्याला खूप प्रेम मिळतं, समजून जा त्याला सगळे घाबरतात. नाव क्वॉलिटीसाठी असू शकतं, जसं की, अरे हा वेळेत येतो, हा खूपच दिलदार व्यक्ती आहे, अरे हा खूप चांगला वागतो... नाहीतर मग नाव खराब केलं जातं..."

"बदनाम करुन इंडस्ट्रीच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो..."

गोविंदानं याच मुद्द्यावर पुढे बोलताना सांगितलं की, "देव हा सन्मान आणि अपमानाचा स्वामी आहे, पण देवाभोवती असलेले लोक त्याचा फायदा घेतात..." पुढे बोलताना तो म्हणाला, "काहीही झालं तरी, नावाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे कलंक लावला जातो आणि त्या व्यक्तीला बाहेर काढलं जातं..." यादरम्यान, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचं उदाहरण देत गोविंदा म्हणाला, "अमिताभ बच्चन जी घ्या, ते एक उत्तम उदाहरण आहे... ते 14-15 वर्ष बेपत्ता होते, त्यावेळी त्यांना अभिनय माहीत नव्हता का? राजेश खन्ना यांच्या बाबतीतही असंच घडलं..."

सर्वात शेवटी कोणत्या फिल्ममध्ये दिसलेला गोविंदा? 

दरम्यान, गोविंदा आज पडद्यापासून दूर असेल, पण एक काळ असा होता, जेव्हा लोक त्याच्या अभिनयानं थक्क व्हायचे आणि त्याच्या डान्सचं कौतुक करायचे. त्याच्या एका स्माईलवर लाखो तरुणींच्या काळजाची धडधड वाढायची. पण, आज तोच सुपरस्टार गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित आहे. गोविंदा शेवटी 2019 मध्ये आलेल्या 'रंगीला राजा' सिनेमात दिसलेला, ज्यामध्ये त्यानं दुहेरी भूमिका साकारली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sudha Chandran On Govinda: गोविंदाचं करिअर कुणी बर्बाद केलं? प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, सगळंच स्पष्ट सांगून टाकलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget