Coronavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित
जागतिक आरोग्य संघटना WHO कडून कोरोना व्हायरस या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. आतापर्यंत या व्हायरसने तीन हजारहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
![Coronavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित coronavirus COVID-19 can be characterized as a pandemic by who Coronavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/11231459/corona-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोना विषाणूनं जगभरात हाहाकार माजवला असून याची गंभीर दखल आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)घेतली आहे. जवळपास 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तर, भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
चीनच्या वुहान प्रातांतून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत तीन हजार 200 च्या जवळपास लोकांचा बळी घेतला आहे. तर, जगातिल जवळपास 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ या जागतिक संघटनेने कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केलं आहे. भारतात आतापर्यंत 62 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना भारताचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत तरी मिळणार नसल्याचे सांगितले आहे.
#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप
भारतातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय भारतातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चाललाय. आतापर्यंत देशात कोरोनाचे 62 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 16 परदेशी पर्यटाकांचा समावेश आहे. केरळमध्ये सर्वाधिक 17 कोरोनाग्रस्त असून त्याखालोखाल हरियाणा 14, उत्तरप्रदेश 9 आणि महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे. तर दिल्ली 4 आणि राजस्थानात 3 रुग्ण आढळून आले आहे. या सर्वांवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
#Coronavirus | राज्यात कोरोनाचे 10 रुग्ण, मात्र काळजीचं कारण नाही : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन संपूर्ण जगभर कोरोनाची दहशत आहे. राज्यात कोरोनाचे 10 रुग्ण पॉझिटिव्ह असून काळजीचं कारण नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसंच प्रशासनावर ताण येत असल्याने अधिवेशन शनिवारपर्यंत आटोपणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले. विधिमंडळाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात आठ व्यक्तींना बाधा झाली आहे तर मुंबईत दोघांना बाधा झाली आहे. राज्य सरकार या रुग्णांवर लक्ष ठेऊन आहे. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला म्हणजे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे.
Coronivirus | पुण्यातील कोरोना व्हायरसचे रुग्ण व्यवस्थित; काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)