एक्स्प्लोर

#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप

कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव शनिवारी येणार असून अधिवेशनाचा समारोप देखील शनिवारी होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई : कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव शनिवारी येणार असून अधिवेशनाचा समारोप देखील शनिवारी होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या लोकं धास्तावले आहेत. अर्थात यामध्ये जास्त घाबरण्यासारखं काही नाही, असं प्रशासनाकडून आणि डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दी होणारे अनेक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत सुरु असलेलं विधीमंडळाचं अधिवेशन देखील आटोपतं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  हे अधिवेशन 20 मार्चपर्यंत चालणार होते,मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता अधिवेशनाचा समारोप शनिवार, 14 मार्च रोजी होणार आहे. #CoronaVirus | कोरोनाचा धसका, तुकाराम बीजेवर सावट, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात एन्ट्री केल्याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर आता सरकार, प्रशासनासह नागरिक देखील दक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण सात रुग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील पाच पुण्यातील तर दोन रुग्ण हे मुंबईतील असल्याची माहिती आहे.  कोरोनाच्या धसक्याने राज्यातील अनेक देवाधिकांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. तर मुंबईत सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनावर देखील कोरोना इफेक्ट झाला आहे. Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा आज कोरोनाच्या भीतीने विधिमंडळात अनावश्यक प्रवेश बंदी करण्यात आली. आज विधिमंडळात एक दिवसाच्या पासेसवर बंदीचे निर्देश देण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष, सभापती किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही पासेसचे वाटप न करण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या.  राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत सध्या तरी बदल होणार नाही, अशी माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली होती.मात्र अखेर बैठकीत अधिवेशन गुंडाळण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण; राज्यात एकूण 7 कोरोनाग्रस्त चॉकलेट ऐवजी सॅनिटायझर आज विधीमंडळात अनेक मंत्री, आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक हे चक्क सॅनिटायझर घेऊन फिरत होते. विधी मंडळात कोणी चॉकलेट देत होते, तर कोणी वेलची, पण आज लोक एकमेकांना सॅनिटायझर देत असल्याचे चित्र होते. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी तर विधी मंडळाच्या पायऱ्यांवर पत्रकारांच्या हातावर. "तुम्ही सगळ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे, तुम्ही पण हात मिळवताना काळजी घेतली पाहिजे" असं म्हणत सॅनिटायझर वाटप केलं. Corona Virus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल  विधिमंडळात एकदिवसीय न पास देण्याचा निर्णय विधी मंडळात सध्या मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या कामासाठी येतात. शाळेतील मुलं, विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक विधानभवनात कामकाज पाहायला येतात. विधिमंडळात खूप गर्दी असते त्याबाबत आमदारांनी पण प्रश्न उपस्थित केले होते. ही गर्दी टाळावी म्हणून एकदिवसीय पास न देण्याचा निर्णय पण झाला आहे. बाहेरून एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती विधी मंडळात आली तर इथं अनेक आमदार, मंत्री अनेकजण येतात. इथं मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो, अशीच चर्चा सगळ्यांमध्ये रंगली होती. या सगळ्यात कोणीतरी मास्क घालून फिरताना पण दिसत होतं. एकूणच कोरोनाचे सावट आज दिवसभर विधी मंडळावर होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget