एक्स्प्लोर
#Coronavirus | राज्यात कोरोनाचे 10 रुग्ण, मात्र काळजीचं कारण नाही : उद्धव ठाकरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरु असलेलं विधीमंडळाचं अधिवेशन देखील आटोपतं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन 20 मार्चपर्यंत चालणार होते, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता अधिवेशनाचा समारोप शनिवार, 14 मार्च रोजी होणार आहे.
मुंबई : संपूर्ण जगभर कोरोनाची दहशत आहे. राज्यात कोरोनाचे 10 रुग्ण पॉझिटिव्ह असून काळजीचं कारण नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसंच प्रशासनावर ताण येत असल्यानं अधिवेशन शनिवारपर्यंत आटोपणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले. विधिमंडळाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात 8 व्यक्तींना बाधा झाली आहे तर मुंबईत 2 जणांना बाधा झाली आहे. राज्य सरकार या रुग्णांवर लक्ष ठेऊन आहे. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला म्हणजे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे. 1 मार्च रोजी एक पर्यटकांचा ग्रुप परदेशातून राज्यात आला आहे. त्यांच्यामार्फतच राज्यात हे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र नागरिकांनी घाबरु नये, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन क्षेत्रिय स्तरावर असावे यासाठी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विना प्रेक्षक आयपीएल सामन्यांसंदर्भात कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकारपरिषदेत दिली.
#CoronaVirus | कोरोनाचा धसका, तुकाराम बीजेवर सावट, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एक मागणी आली आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजेसला सुट्टी देण्यात यावी. मात्र याबाबत अजून निर्णय घेतला गेलेला नाही. याबाबत दोन दिवस आढावा घेत राहू. मग निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. काही ठिकाणी परीक्षा सुरु असल्याने तत्काळ कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जर सुट्या देण्याची गरज वाटलीच तर तसा निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा
त्यांनी सांगितलं की, दुबईला जो ग्रुप गेला होता. त्यात 40 जण होते. 1 तारखेला हा ग्रुप मुंबईत आला. पण लक्षणं 6-7 मार्चनंतर दिसली. ठाकरे म्हणाले की, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. तसंच मास्क लावायची गरज नाही, हात साफ ठेवावेत.
विधिमंडळात एकदिवसीय न पास देण्याचा निर्णय
विधी मंडळात सध्या मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या कामासाठी येतात. शाळेतील मुलं, विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक विधानभवनात कामकाज पाहायला येतात. ही गर्दी टाळावी म्हणून एकदिवसीय पास न देण्याचा निर्णय झाला आहे. बाहेरून एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती विधी मंडळात आली तर इथं अनेक आमदार, मंत्री, अधिकारी तसेच अनेकजण येतात. इथं मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो, अशीच चर्चा सगळ्यांमध्ये रंगली होती. या सगळ्यात कोणीतरी मास्क घालून फिरताना पण दिसत होतं. एकूणच कोरोनाचे सावट आज दिवसभर विधी मंडळावर होते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement