Coronavirus Cases Today : देशावर ओमायक्रॉनचं संकट; 24 तासांत 9 हजार 216 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 216 नव्या दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today : जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमायक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव (Coronavirus) सुरुच आहे. अशातच काल (गुरुवारी) देशात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याचं निष्पन्न झालं. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 216 नव्या दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊयात सध्याची कोरोनास्थिती...
आतापर्यंत 4 लाख 70 हजार 115 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 99 हजार 976 सक्रिय रुग्ण आहेत. या महामारीमध्ये 4 लाख 70 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 45 हजार 666 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही बातमी दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील 29 देशात 373 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये आतापर्यंत 42 ते 52 म्युटेशन आढळळे आहे. आतापर्यंत आलेल्या अहवाला नुसार हा ओमिक्रॉनचा व्हेरियंट जास्त तीव्रतेचा नाही.
राज्यात काल (गुरुवारी) 796 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 952 रुग्ण कोरोनामुक्त
कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (गुरुवारी) 796 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 952 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 हजार 290 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात काल (गुरुवारी) 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 73 हजार 24 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 897 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 57 , 28, 280 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 228 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 228 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 216 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,42,392 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.