देशात कोरोना लसीकरणाची मोहिम 50 कोटींच्या घरात, मागील 24 तासात 37 लाख लोकांना लस
देशात आतापर्यंत 48,93,42,295 लसीचे डोस देण्यात आले आहे, यात पहिल्या आणि दुसर्या डोसचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत 48.93 कोटीहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात आतापर्यंत 48,93,42,295 लसीचे डोस देण्यात आले आहे, यात पहिल्या आणि दुसर्या डोसचाही समावेश आहे. गेल्या 24 तासात कोरोना लसीचे सुमारे 37 लाख डोस देण्यात आले आहेत
- 1, 03, 21,218 आरोग्य सेवा आणि 1,80,12,481 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.
- 79, 16, 997 आरोग्य सेवा आणि 1,15,34,779 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
- 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 10,90,91,506 लोकांना पहिला डोस तर दुसरा डोस 4,09,44,600 लोकांना देण्यात आला.
- 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 7,72,63,332 लोकांना पहिला आणि 3,75,43,060लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला गेला आहे.
- कोरोना लसीचा पहिला डोस 18 ते 44 वर्षे वयोगटातील 16,64,37,738 लोकांना पहिला आणि 1,02,76, 584 लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
देशभरात लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. 2 जानेवारीपासून फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले. कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला, ज्यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसोबत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत, अशा लोकांचे लसीकरण सुरू झाले. त्याचवेळी, 1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येकासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. तर 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे.
गेल्या 24 तासांत 42,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 533 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केरळात प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. केरळात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 22,414 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 41,726 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तीन कोटी 18 लाख 12 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 26 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 9 लाख 74 हजार रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.