एक्स्प्लोर

भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?

सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडून आले.

Bhiwandi News : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात (Bhiwandi West Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) काँग्रेस (Congress) पक्षाचे उमेदवार दयानंद चोरगे (Dayanand Chorghe) निवडणूक लढवत आहेत. परंतु, या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये राहून समाजवादी पक्षाने (Socialist Party) आपला उमेदवार रियाज आजमी (Riyaz Azmi) यांना उभा केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे बंडखोर विलास पाटील (Vilas Patil) आणि  आसमा चिखलेकर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडून आले. भिवंडी पूर्वे खासदार सुरेश म्हात्रे महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात उपस्थित असतात परंतु भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या कार्यक्रमास अनुपस्थिती दाखवत आहेत. शिवाय महाविकास आघाडी च्या कार्यक्रमात उपस्थित न राहता समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमास ते पोहोचतात त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. खासदार सुरेश म्हात्रे भिवंडी पूर्वेत लक्ष देत आहेत तर भिवंडी पश्चिम मध्ये दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय.

खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या या वागणुकीमुळे भिवंडी पश्चिम चे उमेदवार यांनी सांगितले की जर खासदार म्हात्रे महाविकास आघाडी राहून दुसऱ्यांना साथ देत असतील तर मी ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहे आणि शहापूर व मुरबाड विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष निवडणूक लढवत आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांना मदत करणार नाही अशा इशरा देत यासंदर्भात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहिती कळवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढत होत असताना काँग्रेस बंडखोर विलास पाटील व समाजवादी चे रियाज आजमी तसेच एमआयएम पक्षाचे वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक अतिशय रंगतदार व चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन वेळा निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्यांदा संधी मिळते की पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारास हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र समाजवादी पक्ष आणि बंडखोर यांच्यामुळे मात्र महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे हे नक्की त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देतो आणि गुलाल कोण उधळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 11 November 2024Muddyach Bola Worli : ठाकरे गड राखणार की इंजिन एंट्री करणार? वरळीकरांच्या मनात नेमकं कोण?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 11 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Embed widget