एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘एव्हरेस्ट’वीर पोलीस हवालदार रफिक शेख यांच्या पायाला हिमदंश
काठमांडू : महाराष्ट्राचे पोलिसांमधील पहिले ‘एव्हरेस्ट’वीर रफिक शेख यांच्या पायाला इजा झाली आहे. एव्हरेस्ट उतरताना रफिक शेखला हिमदंश झाला असून, काठमांडूच्या खासगी रुग्णालयात रफिक यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रफिक शेख यांच्या पायाला हिमदंश झाल्यानंतर कॅम्प-2 पासून हेलिकॉप्टरने रेस्क्यू केले गेले. सध्या रफिक यांच्यावर काठमांडूत उपचार सुरु असून, उद्या दिल्लीला हलवले जाणार आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचं एक पथक दिल्लीला रवाना झालं आहे.
पाहा फोटो : पोलीस हवालदार रफिक शेखची 'एव्हरेस्ट'ला गवसणी
रफिक शेख हे औरंगाबादमध्ये पोलीस हवालदार असून, 4 एप्रिलला ते एव्हरेस्ट मोहिमेवर गेले होते. दोनदा अपयशानंतर तिसऱ्यांदा रफिक यांनी एव्हरेस्ट सर केला. मात्र, एव्हरेस्ट उतरताना त्यांच्या पायाला इजा झाली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement