एक्स्प्लोर
भारतीय हवाई हद्दीत चीनच्या हेलिकॉप्टरच्या चार मिनिट घिरट्या
![भारतीय हवाई हद्दीत चीनच्या हेलिकॉप्टरच्या चार मिनिट घिरट्या Chinese Chopper Sighted In Indian Airspace Latest Update भारतीय हवाई हद्दीत चीनच्या हेलिकॉप्टरच्या चार मिनिट घिरट्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/04070331/HElicopter-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
देहरादून : भारत-चीन सिमेवरील चमोली जिल्ह्यातील बरहोटी परिसरातील भारताच्या हवाई हद्दीत चीनचे एक हेलिकॉप्टर घिरट्या घालताना पाहायला मिळालं. या घटनेनंतर अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
चमोली पोलीस अधिक्षक तृप्ती भट्ट यांनी सांगितलं की, ''सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास एक हेलिकॉप्टर भारताच्या हवाई हद्दीतील बरहोटी परिसरात घिरट्या घालताना दिसलं. जवळपास चार मिनिटांपर्यंत हे हेलिकॉप्टर भारताच्या हवाई हद्दीत घिरट्या घालत होतं.''
दरम्यान, अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याची माहितीही भट्ट यांनी यावेळी दिली. पण ही घटना नकळत झाली आहे, की जाणून बुजून चीनच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हद्दीत प्रवेश केला, याबद्दल सांगणे अशक्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
यापूर्वी 2014 मध्येही याच परिसरात चीनचे लढाऊ विमान घिरट्या घालताना दिसलं होतं. तर 2015 मध्ये चीनी लष्काराने गायरान नष्ट केल्याचं समोर आलं होतं. यानंतर 2016 पासून चीनने चमोलीमध्ये घुसखोरी केल्याच्यं वृत्त होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)